धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पिस्तुलसह पकडला मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 13:20 IST2018-05-17T13:20:26+5:302018-05-17T13:20:26+5:30

७४ लाख ८३ हजाराची कारवाई : चौघा संशयितांना अटक

Mohali police in Dhundali caught with pistol | धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पिस्तुलसह पकडला मुद्देमाल

धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पिस्तुलसह पकडला मुद्देमाल

ठळक मुद्देमोहाडी पोलिसांनी पकडली पिस्तूल व दरोड्याचे साहित्य७४ लाख ८३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्तचार संशयितांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोहाडी पोलिसांनी सलग दुसºया दिवशी गावठी कट्टासह मुद्देमाल पकडला आहे़ बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अवधान एमआयडीसी येथून संशयित कार जप्त करण्यात आली़ 
तपासणी केली असता पिस्तूल, लोखंडी टॅमीसह अन्य दरोडा घालण्याचे साहित्य मिळून आले़ याप्रकरणी कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ गुरुवारी पहाटे त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अटकेत असलेल्या संशयितांमध्ये अजय प्रताप कटवाल (२४, रा़ नगावबारी, धुळे), ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता (२२, रा़ हिरागंज जि़ प्रतापगड, उत्तरप्रदेश), जयप्रकाश राजाराम यादव (२८, रा़ दिनदासपूर जि़ वाराणसी, उत्तरप्रदेश) आणि जुल्फकार हस्मतअली इद्रीसी (२३, रा़ हतगवा जि़ प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून कार, मोबाईल, दागिने, पिस्तूल, लोखंडी टॅमी, रेडीअमचे स्टिगर असा एकूण ७४ लाख ८३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ याप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़ 

Web Title: Mohali police in Dhundali caught with pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.