VIDEO: वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:40 PM2021-02-24T17:40:35+5:302021-02-24T17:41:45+5:30

धुळे जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीची थकीत वीजबिल वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

MNS agitation against electricity bill recovery in dhule maharashtra | VIDEO: वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे

VIDEO: वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे

Next

धुळ्यात महावितरणकडून सुरू असलेल्या थकीत वीजबिल वसुलीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट अधिक्षक अभियंत्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांच्यावर फुटाणे फेकून निषेध व्यक्त केला. 

धुळे जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीची थकीत वीजबिल वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीजबिलं न भरण्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे. त्यात मीटर कापण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशाराही याआधी मनसेच्या नेत्यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन केलं. अधिक्षक अभियंत्यांच्या टेबलावर फुटाणे फेकत त्यांना वीजबिल वसुलीबाबत जाब विचारण्यात आला.

Web Title: MNS agitation against electricity bill recovery in dhule maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.