लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील लोणखेडी गावाच्या उमरा नाल्यात एका अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे पाऊण वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील लोणखेडी गावातच राहणारा संशयित दिनेश रमेश पवार (पाटील) याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ गुन्हा नोंदविताच संशयित दिनेश पवारला अटक करण्यात आली आहे़ या घटनेमुळे गाव परिसरात खळबळ उडाली आहे़
लोणखेडीतील उमरा नाल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:00 IST