अल्पवयीन मुलीवर नराधमकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:24 IST2019-03-18T18:24:02+5:302019-03-18T18:24:09+5:30

शिंगावेतील घटना : पाच दिवसानंतर गुन्हा 

Minor girl raped by stigma | अल्पवयीन मुलीवर नराधमकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर नराधमकडून बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विटाभट्टी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर घरात एकटी असल्याची संधी साधून बळजबरीने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात घडली़ घटनेच्या तब्बल पाच दिवसांनंतर शिरपूर पोलीस ठाण्यात संशयित अमोल एकनाथ पाटील (रा़ शिंगावे) या नराधमाविरोधात गुन्हा दाखल झाला़ 
शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात विटाभट्टीवर विट थापण्याचे काम करणाºया गरीब परिवारातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १२ मार्च रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास अत्याचार करण्यात आला़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई-वडील विटाभट्टीवर काम कामाला गेलेले असताना ती घरात एकटी झोपली होती़ १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घराचा मागचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला़ तिने दार उघडले असता अमोल एकनाथ पाटील हा दारात उभा असल्याचे दिसले़ तिने त्याला काय काम आहे अशी विचारणा केली़ तेव्हा त्याने तिचा हात धरुन घरात ओढून नेले़ मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे तो म्हणाला़ पीडित मुलीने त्याच्या मागणीला नकार दिला़ यावर तुझ्या आई-वडीलांना व भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली़ यानंतर तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला़ त्यानंतर हा नराधम पळून गेला़ 
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन अमोल एकनाथ पाटील या संशयित नराधम विरोधात भादंवि कलम ३७६ (१) (३), (आय) ५०६ यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अ‍ॅट्रासिटी कलमातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: Minor girl raped by stigma