छापा टाकून लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 22:58 IST2019-10-18T22:57:58+5:302019-10-18T22:58:23+5:30

जोयदा येथील एका घरात झाली कारवाई

Millions of liquor seized after raiding | छापा टाकून लाखांचा मद्यसाठा जप्त

छापा टाकून लाखांचा मद्यसाठा जप्त

शिरपूर/पळासनेर : शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील एकाच्या घरावर भरदुपारी अचानक छापा टाकून १ लाख ९ हजारांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला़ ही कारवाई शिरपूर तालुका पोलिसांनी केली आहे़ याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे़ 
शिरपूर तालुक्यातील जोयदा गावात सुरसिंग वाहºया पावरा याच्या राहत्या घरात देशी-विदेशी दारुचा साठा हा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावरा याच्या घरावर छापा टाकला़ ४६ हजार ८० रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या २८८ बाटल्या, १० हजार ५६० रुपये विदेशी दारुच्या ४८ बाटल्या, ५२ हजार ८९६ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या ९१२ बाटल्या असे एकूण १ लाख ९ हजार ५३६ रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़ 
याप्रकरणी संशयित सुरसिंग वाहºया पावरा याला अटक करण्यात आली आहे़ 
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी माने यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक वारे, हेड कॉन्स्टेबल गवळी, कर्मचारी संजय जाधव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, शिंदे यांनीही कारवाई केली आहे़  

Web Title: Millions of liquor seized after raiding