आयुक्तामुळे सभा रद्द.. भाजपात मतभेद नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:48+5:302021-03-27T04:37:48+5:30
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने सायकांळी घेण्याचे ठरले होत. सायंकाळच्या सभेला सभापती ...

आयुक्तामुळे सभा रद्द.. भाजपात मतभेद नाहीत
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने सायकांळी घेण्याचे ठरले होत. सायंकाळच्या सभेला सभापती संजय जाधव, सहाय्यक आयुक्त शिल्पा नाईक, प्र. नगरसचिव मनाेज वाघ उपस्थित होते. कोरोना पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची व्हिडीओ काॅन्फरन्स असल्याने आयुक्त अजिज शेख सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान सभेला सुरवात होण्याआधी नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, अर्थसंल्पीय सभा महत्वाची असल्याने आयुक्त अजिज शेख यांनी उपस्थित राहणे गरजेच आहे. त्यामुळे ही सभा ही तहकूब करण्यात यावी, अशी मागणी सभापती संजय जाधव यांच्याकडे केली. तर नगरसेवक अमिन पटेल म्हणाले की, शहरातील नागरिकांना सध्या मोठ्या प्रमाणात मुलभुत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ही सभा तहकुब न करता कामे मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
नगरसेवक शितल नवले व सुनील बैसाणे यांची दांडी
सकाळी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत शितल नवले व सुनील बैसाणे यांनी सभागृह त्याग केलेल्यानंतर सायकांळी झालेल्या बैठकीला त्यांनी दांडी मारली होती.