पोलीस चौकीच्या मागेच मेडीकल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:55 IST2019-10-12T20:54:41+5:302019-10-12T20:55:07+5:30

रोकडसह औषधे लंपास : पहाटेची घटना

Medical shop behind the police outpost burst | पोलीस चौकीच्या मागेच मेडीकल दुकान फोडले

पोलीस चौकीच्या मागेच मेडीकल दुकान फोडले

धुळे : मील परिसरातील चितोड रोडवरील पोलीस चौकीच्या मागे असलेले मेडीकल दुकान चोरट्याने पहाटे फोडले़ ही बाब सकाळी उजेडात आली़ यात रोकडसह औषधांचा साठा लंपास करण्यात आला आहे़ दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात दोन चोरटे कैद झाले आहेत़ 
शहरातील वैभव नगरात राहणारे विनोद बाविस्कर यांचे चितोड रोडवरील पोलीस चौकीच्या मागील बाजुस प्रभा मेडीकल नावाचे मेडीकल दुकान आहे़ शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करुन ते घरी गेले़ शनिवारी सकाळी त्यांच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी दुकानात येऊन पाहीले असता चोरट्याने दुकानाचे शटर टॅमीने उचकवून आत प्रवेश करीत ७ ते ८ हजाराची रोकड, लॅपटॉप आणि काही प्रमाणात औषधांचा साठा लंपास केल्याचे उघडकीस आले़ 
चोरट्यांचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दोन अज्ञात चोरट्यांनी पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी केल्याचे कॅमेरातील चित्रांवरुन समोर येत आहे़ त्यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता़ चोरट्यांच्या हालचालीवरुन ते माहितगार असल्याचे बोलले जात आहे़ चोरीच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ 
दरम्यान, ज्या मेडीकल दुकानात चोरी झाली ते दुकान पोलीस चौकीच्या मागेच आहे़ या ठिकाणी पोलीस नियुक्त असतात़ तरीही चोरट्यांनी दाखविलेली हिम्मत पाहता ही पोलीस चौकी शोभेची आहे का, असा सवाल संतप्त नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे़ शिवाय पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे़

Web Title: Medical shop behind the police outpost burst