मेडलिस्ट गतीमंद गोेलूला अखेर मिळाले ‘मातृछत्र’, दोघेही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:41 IST2019-11-16T22:41:36+5:302019-11-16T22:41:55+5:30

बालकल्याण समितीचे कौतुकास्पद कार्य । जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सोपविले

Medalist Gatimando Gellu finally got 'Mother Chhatra', both fell deep | मेडलिस्ट गतीमंद गोेलूला अखेर मिळाले ‘मातृछत्र’, दोघेही गहिवरले

मेडलिस्ट गतीमंद गोेलूला अखेर मिळाले ‘मातृछत्र’, दोघेही गहिवरले

धुळे : बºयाचदा गतिमंदपणामुळे पालक आपल्या बालकांना सोडून देण्याची भूमिका घेतात़ अशावेळी अनाथालय या मुलांना सांभाळत असलेतरी अशा गतिमंदांमध्ये देखील प्रगल्भ शक्ती असते़ याच जोरावर गोळाफेकीत गोल्ड मेडल मिळविणाºया १९ वर्षीय गोलू कांबळे केवळ धुळ्यातील बालकल्याण समितीच्या प्रयत्नाने पुन्हा मातेचे छत्र लाभले़ जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोलूला त्याच्या मातेकडे सोपवितांना केवळ बालकल्याण समितीच्या पदाधिकाºयांनाच नाही तर उपस्थितांनाही गहिवरुन आले़  
गोलू संजय कांबळे (१९) या मुलाला बालकल्याण समिती, पुणे यांच्या आदेशाने बालकल्याण समिती, धुळे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला होता़ त्याला शिरपूर येथील अनाथ गतिमंद मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले होते़ कै ़    बापूसाहेब एऩ झेड़ मराठे विधायक संस्था, थाळनेर यांच्या मार्फत हे अनाथगृह चालविले जाते़ 
२०१४ मध्ये संस्थेत दाखल झालेल्या गोलूच्या अंगी अदभूत शक्ती असल्याचे निदर्शनास आले़ संस्थाध्यक्ष भगवान तलवारे आणि सचिव सुनील मराठे यांनी गोलूची प्रतिभा ओळखली़ त्यानुसार त्याला हस्तकला, मुर्तीकाम, रंगकाम, स्क्रिन प्रिटींग या व्यवसाय शिक्षणाबरोबरच नियमित शालेय शिक्षण देखील दिले जात होते़ गोलूने दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोळा फेक प्रकारात गोल्ड मेडेलही मिळविले आहे़ 
गोलूच्या परिवाराला शोधण्याची जबाबदारी सोपविलेल्यांनी औरंगाबाद जिल्ह्यासह सिल्लोड परिसरातही शोध घेतला होता़ कर्मचाºयांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला अखेर यश आले़ गोलूच्या घरासह त्याची आई आणि मामाचा शोध लागला़ ही माहिती धुळ्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाने आणि अन्य सदस्यांना कळविण्यात आली़ कागदपत्रांची पुर्तता करुन गोलूला त्याची आई माधुरी संजय कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले़ 
गोलू याला त्याची आई माधुरी यांच्याकडे सोपविण्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम देखील घेण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन, बालकल्याण समिती धुळेचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाने, सदस्य प्रा़ सुदाम राठोड, प्रा़ वैशाली पाटील, मिना भोसले यांच्यासह भगवान तलवारे, सुनील मराठे, समाजकल्याण अधिकारी भरत धिवरे, पी़ यू़ पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिंपी, सुनील वाघ यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़ सर्वांनाच गहिवरुन आले़ 
गोलूच्या खाणाखुणांद्वारे सुरु होता शोध 
गतिमंद असला तरी गोलू हा खाणाखुणा करुन त्याच्या घराचा परिसर तसेच तेथील मंदिर, शाळा, इमारत बाबत सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करीत होता़ त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गोलूच्या परिवारासह त्याच्या घराचा शोध घेण्याचे काम सुरु होते़ यासाठी ‘गुगल’ची देखील मदत घेण्यात आली़ संस्थेने धुळे येथील बालकल्याण समितीच्या परवानीने दोन कर्मचाºयांची स्वतंत्र नियुक्ती केली होती़ त्यांच्यावर परिवाराचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविली होती़ 

Web Title: Medalist Gatimando Gellu finally got 'Mother Chhatra', both fell deep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे