शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यम प्रकल्प स्थळी यांत्रिकी विभागाचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:41 IST

दरवर्षाप्रमाणे भेट : पाणी गळती मात्र सुरु

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाची यांत्रिकी विभागाच्या पथकाने भेट देवुन संपुर्ण धरणाची पाहणी केली. हा दरवर्षीचा सोपस्कार पूर्ण केला जातो़ मात्र वाया जाणारे पाणी अद्याप बंद झालेले दिसुन येत नाही.दरवर्षी वर्षातून दोनवेळा हे पथक येत असते. मागील वर्षी देखील या विभागाने पाहणी करुन अहवाल धरण सुरक्षा विभागाकडे देवुन योग्य दुरुस्ती करु असे सांगितले. मात्र वर्षे उलटून गेले तरी या प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या मुख्य वितरकांना लागलेली पाण्याची गळती थांबलेली दिसुन येत नाही. दररोज या ठिकाणाहून लाखो लिटर पाणी वाया जाते. तसेच या पाण्याचा पाझर नजीकच्या शेतशिवारात होत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे हे शेतकरी त्रस्त आहेत. या प्रकल्पाला दहा वक्राकार दरवाजे असुन यातुन देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती दिसुन येत आहे. मग दरवर्षी पाहणी करुन हे पथक नेमके साध्य करते तरी काय? का नुसता सोपस्कार पूर्ण केला जातो अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा दिसुन आली. यासंदर्भात भ्रमणध्वनीवरुन पथकातील सदस्यांची संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :Dhuleधुळे