अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केले माती पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:02+5:302021-05-16T04:35:02+5:30
रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस अधिक खराब होऊन शेतजमीन नापिकी होत चालल्या आहेत. माती आपली माता असून ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केले माती पूजन
रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस अधिक खराब होऊन शेतजमीन नापिकी होत चालल्या आहेत. माती आपली माता असून तिचे स्वसंरक्षण करणेदेखील आपले कर्तव्य असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातून थोडी माती आणून येथील राधाकृष्ण मंदिरात एकत्रित केली. विधीवत प्रत्येक उपस्थित शेतकऱ्यांनी या मातीचे पूजन केले. यावेळी किसान संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम तावडे, संजय बागुल, ईश्वर वाघ, प्रशांत पवार, कुलदीप आडगाळे, जयवंत पाटील, नारायण महाराज, गंगाराम भोई, रामदास पाटील, ईश्वर वाघ, सुरेश आडगाळे, लक्ष्मण भोई, विजय आडगाळे व भारतीय किसान संघाचे उत्तम तावडे, संजय बागुल, गजानन माळी, किसन माळी, सतीश शिरसाठ, बलदेव खैरनार, चंद्रकांत भावसार, किशोर आडगाळे उपस्थित होते आदी उपस्थित होते.