बाप की राक्षस?; दारूसाठी स्वत:च्या कोवळ्या मुलांना फेकलं नदीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:25 IST2025-02-06T15:16:07+5:302025-02-06T15:25:42+5:30
कुंभार टेक येथे राहणाऱ्या सुनील याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीशी नेहमी वाद होत असत.

बाप की राक्षस?; दारूसाठी स्वत:च्या कोवळ्या मुलांना फेकलं नदीत
Dhule Crime : येथील तापी नदी पात्रात मंगळवारी रात्री मृतदेह आढळलेल्या बहीण-भावाला त्यांच्या निर्दयी बापानेच नदी पात्रात फेकल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. कार्तिक (वय ६) व चेतना सुनील कोळी (वय ३) अशी मयत मुलांची नावे आहेत.
पत्नीने दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनील कोळी नामक या निष्ठुर बापाने चिमुकल्या भावंडांचा बळी हकनाक घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. कुंभार टेक येथे राहणाऱ्या सुनील याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीशी नेहमी वाद होत असत. सुनीलने स्वतःच आपण मुलांना नदीत फेकून दिले असल्याचे पत्नीला सांगितले. हे ऐकताच पत्नीने हंबरडा फोडला. सुनील याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुनीलने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पत्नीने पैसे न दिल्याने दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर दुपारी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे (आपल्या आईकडे) घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला होता.