शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कॉँग्रेसच्या बालेकिल्यात कमळ फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:05 IST

शिरपूर तालुका : तीन पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही, भाजपला प्रथमच निर्विवाद यश मिळाले

सुनील साळुंखे ।आॅनलाइन लोकमतशिरपूर : शिरपूर तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र विधानसभा निवडणूक पूर्वी आमदारद्वयींनी भाजपात प्रवेश केल्यामुळे गटात सर्वच्या सर्व जागा पटकावून प्रथमच या पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा रोवला़ तर गट-गणात कॉँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही़यापूर्वी, या तालुक्यात भाजपाला बोटावर मोजण्या एवढ्या देखील जागा मिळविता येत नव्हत्या़ मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी भाजपत प्रवेश केल्याने, तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. केवळ अमरिशभाईच्या करिष्मामुळेच प्रथमच येथील पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. गणाच्या एकूण २८ पैकी २४ जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेसला गणात भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीने गत वर्षापेक्षा एक जागा गमवून निदान खाते तरी उघडले़ कोडीद, आंबे व रोहिणी गणातील तीन अपक्ष उमेदवार निवडून आलेत़अमरिशभार्इंमुळेच भाजपाला गटात सर्वच्या सर्व म्हणजेच १४ जागा पटकावून वर्चस्व राखता आले आहे. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ एक जागा मिळविता आली होती़ या निवडणुकीत गटात अन्य पक्षांना संधीच मिळाली नाही़ विशेषत: बालेकिल्ल्यात कॉँग्रेसला एकही जागा राखता आलेली नाही़विखरण गटात किविप्र संस्थेचे चेअरमन तथा माजी जि़प़सदस्य डॉ़तुषार रंधे हे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ४४३ मताधिक्याने विजयी झालेत़ शिंगावे गटात तत्कालीन जि़प़ उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे केवळ २१ मतांनी विजयी झालेत़ भाटपुरा गटात विद्यमान जि़प़सदस्य प्रा़संजय पाटील हे देखील ६ हजार ९९१ मताधिक्याने विजयी झालेत़ या तिनही गटात अटीतटीची लढत असल्यामुळे या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते़जि.प.चे माजी सदस्य वसंत पावरा यांची पत्नी लताबाई उमर्दा गणात, दहिवद गणात माजी पं़ स़सदस्या आशाबाई पवार, विद्यमान सदस्य बालकिसन पावरा यांची पत्नी खंबाळे गणात रिंगणात होते. ते देखील विजयी झालेत़विखरण गटात जि़प़सदस्य चंद्रकांत पाटील, सांगवी गटात माजी सदस्य रणजितसिंग पावरा, माजी पं़स़सदस्य कणिलाल पावरा, भाटपुरा गटात पं़स़माजी सदस्य शामकांत करंकाळ, विद्यमान जि़प़सदस्य दत्तु पाडवी पळासनेर गणात, विद्यमान पं़स़सदस्य रहेमान पावरा यांचा नातु रविंद्र वळवी हिसाळे गणात, माजी पं़स़सदस्य पदमसिंग जाधव यांचा पुतण्या योगेश जाधव अजनाड गणात, बोराडी गटात रणजितसिंग पावरा यांची पत्नी साधनाबाई पावरा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :Dhuleधुळे