लॉकडाउन काळातील ‘आंदोलनाचा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:38 PM2020-05-22T22:38:39+5:302020-05-22T22:39:00+5:30

सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन : राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आघाडी संघटनेचा समावेश

Lockdown | लॉकडाउन काळातील ‘आंदोलनाचा दिवस’

लॉकडाउन काळातील ‘आंदोलनाचा दिवस’

धुळे : विविध मागण्यांसाठी शुक्रवारी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कामगार - कर्मचारी संयुक्त समन्वय कृती समिती, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आणि शिक्षक संघटना आणि किसान सभेतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यामुळे शुक्रवार हा लॉकडाउन काळातील आंदोलनाचा दिवस ठरला. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगसह सर्वच नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
शिक्षक संघटना - कोरोनाच्या नावाखाली शिक्षणक्षेत्रात गोंधळ वाढत चालला असून शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने शिक्षण मंत्री उदासीन आहे की काय ? महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अडचणीत आली असून शिक्षण विभागात सरकार सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या व शासनाच्या निषेधार्थ भाजपा शिक्षक आघाडी नाशिक विभागाचे २२ मे रोजी उप शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे ,अधिक्षक आरपी पाटील यांना भाजपा शिक्षक आघाडी नाशिक विभाग संयोजक महेश मुळे, भरतसिंह भदोरिया,मनोहर चौधरी, अविनाश पाटील,नितीन कापडीस व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले. तसेच निदर्शने केली.
वैद्यकीय प्रतिनिधी - महाराष्टÑातील वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करुनही शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे एल.आर.राव, राजेश कुळकर्णी, सचिन पारोळेकर, अजय चौधरी, केतन भदाणे, मनोज मराठे, अमोल निशाणे, डबीर शेख, योगेश माळी, चेतन भावसार आदी उपस्थित होते.
राज्य कर्मचारी संघटना - लॉकडाउन काळात कामगार, कष्टकरी, स्थलांतरीत कामगार, व्यावसायिक, शेतकरी हे सर्वच अडचणीत आले आहे. असे असतांना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. याशिवाय केंद्र व राज्य सरकारांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचे निर्णय रद्द करावेत. कामाचे तास पूर्वी प्रमाणेच ८ तास करण्यात यावे, लॉकडाउन कालावधीचे वेतन कामगारांना विनाकामात अदा करा या विशेष मागण्यासाठी कामगार - कर्मचारी संयुक्त सन्मवय कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आले. यावेळी डॉ.संजय पाटील, प्रशांत वाणी, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, हिरालाल सापे, एल.आर.राव यानी सहभाग घेतला.
आंदोलनात नियमांचे काटेकोरपणे पालन
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी तीन ते चार संघटनांचे आंदोलन असतांना नेहमीप्रमाणे गोंधळ गर्दी दिसली नाही. सर्वच संघटनांचे अगदी मोजके चार ते पाच पदाधिकाऱ्यांनीची आदोलनात सहभाग घेतला तसेच निदर्शने केली. सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन दरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तसेच तोंडाला मास्क लावलेले होते. सर्वच पदाधिकारी अगदी शांततेत घोषण दिल्यानंतर गर्दी न करता घरी रवाना झाले.

Web Title: Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे