शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१४ दिवस लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:18 IST

संविधान संरक्षण समिती : अन्यथा मृत्यूंना प्रशासन जबाबदार

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मृतांचा आकडाही मोठा आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावा, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने प्रशासनाकडे केली आहे़समितीचे पदाधिकारी वाल्मिक दामोदर, हरिचंद्र लोंढे, शशीकांत वाघ, सागर ढिवरे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये पहिला रुग्ण आढळला़ एप्रिल ते जून असे दोन महिने रुग्णांची संख्या १०० पेक्षाही कमी होती़ परंतु लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना बाधितांच्या आकड्याने हजारी पार केली आहे़ मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे़धुळे शहरात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे़ दुकानांचे सम विषमचे नियोजन, सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाला़ बाजारात गर्दी उसळली़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला़जिल्ह्यातील परिस्थितीनुसार लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ लॉकडाऊनसाठी शासनाच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही़ कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली आहे़याआधी महापोर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी अशी मागणी केली होती़ तसेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनची मागणी केली आहे़ लॉकडाऊन केले नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, मृत्यू वाढले तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे़धुळे शहरात कोरोनाची साथ अटोक्यात ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांसह महानगरपालिकेच्या आयुक्तांवरही आहे़ या दोन्ही यंत्रणांनी पोलीस दलाची मदत घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली असती तर रुग्णांची संख्या वाढली नसती आणि पर्यायाने मृत्यूदरही वाढला नसता़ या तीनही यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे़

टॅग्स :Dhuleधुळे