शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:35 AM

५८ हजार ७११ यांना मिळाला प्रत्यक्ष लाभ, १७ हजार अद्याप वंचित

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ३८ लाख ४१ हजार ७०६ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यातील ५८ हजार ७११ शेतकºयांना २४२ कोटी ६१ लाख ४९ हजार ४२८ रुपयांची प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरीत १७ हजार ७०७ शेतकरी अद्याप वंचित असून त्यांना १७४ कोटी ७६ लाख ९२ हजार २७८ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. जिल्हा बॅँकेसह राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बॅँक मिळून हा लाभ देण्यात आला आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या १८ याद्या (ग्रीन लिस्ट) धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला प्राप्त झाल्या आहेत. या बॅँकेच्या सभासद असलेल्या ३२ हजार १८५ शेतकºयांना तर राष्टÑीयकृत बॅँकांच्या ४३ हजार ६०८ शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच खाजगी बॅँकांच्या अवघ्या ५१३ व ग्रामीण बॅँकेच्या ११२ लाभार्थ्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ लाभार्थ्यांपैकी ५८ हजार ७११ शेतकºयांना आतापर्यंत प्र्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. त्यात दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत ३४ हजार ९७८ शेतकºयांचे १९० कोटी २६ लाख २१ हजार १६३ रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. एकरकमी परतफेड योजने (ओटीएस) अंतर्गत ३ हजार ६०६ शेतकºयांना १६ कोटी ६९ लाख ५७ हजार ४९६ रुपयांचा लाभ मिळाला. तर ज्या शेतकºयांनी नियमित कर्ज फेड केली आहे, अशा २० हजार १२७ शेतकºयांना प्रोत्साहन स्वरुपात एकूण ३५ कोटी ६५ लाख ७० हजार ७६७ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.ओटीएस योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षादरम्यान या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी शेतकºयांना अद्याप लाभ मिळालेला किंवा देण्यात आलेला नाही, त्यात दीड लाख मर्यादेपर्यंतच्या ९०२ शेतकºयांचा समावेश असून त्यांना २ कोटी ६६ लाख ८१ हजार ५४४ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ओटीएस योजनेंतर्गत समाविष्ट तब्बल १६ हजार १२२ शेतकरी अद्याप संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून त्यांनी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी त्यापेक्षा जास्त असलेल्या उर्वरीत एकूण १ कोटी ७० लाख ६४ हजार ७११ रुपये एवढ्या रकमेचा भरणा झालेला नाही. त्या साठीची मुदत आॅक्टोबरअखेरपर्यंत वाढविल्याचे सांगण्यात आले. तर नियमित कर्जफेड करणाºया ६८३ शेतकºयांना अद्याप त्यांना मिळणारी १ कोटी ४५ लाख ३९ जार ५९० अद्याप त्यांच्या बॅँकखात्यात जमा झालेली नाही.दरम्यान सर्वच शेतकºयांना वेळेत कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास त्यांना खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करणे सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी संबंधित विभागाने व शेतकºयांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Dhuleधुळे