शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांच्या आत पिक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:38 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण करा

धुळे : जिल्ह्यातून पीक कजार्साठी पात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांकडे अर्ज सादर करावेत. त्यांनी शेतकºयांचे अर्ज बँकेच्या शाखेत सादर करावेत़ त्यानंतर संबंधित बँकेने पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पाच दिवसांत पूर्ण करून निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली़राज्यस्तरीय बँकर्स समिती मार्फत खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी धुळे जिल्ह्यातील १९ बँकांना ८३७ कोटी ६६ लाख रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत धुळे जिल्ह्यातील बँकांनी ३२ हजार ७९ शेतकºयांना २६२ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून ३१.४० टक्के लक्षांक साध्य केला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या एकूण शेतकºयांपैकी १३ हजार ३११ शेतकºयांना ८५ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.धुळे जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकाना ५९१ कोटी ७५ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर १३६ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील ११ खासगी बँकाना ९१ कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलै अखेर १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ४ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर दोन कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १५० कोटी १७ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १०४ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.खरीप पीक कर्ज वितरणाचा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी आढावा घेतला आहे. मागील आठवड्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनीही पीक कर्ज वितरणाचा आढावा घेवून व्यापक अभियान राबवावे, अशा सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेले आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी एकूण ४५ हजार ८२९ शेतकºयांची यादी उपलब्ध झालेली आहे. त्यापैकी ४३ हजार ५४० शेतकºयांनी आधार प्रमाणीकरण केले आहे़ २ हजार २८९ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. संबंधित शेतकºयांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा बँक शाखेत संपर्क करून १५ आॅगस्ट पूर्वी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

टॅग्स :Dhuleधुळे