पानटपरी चालकाच्या डोक्यात दारूची बाटली टाकली, शिंदखेड्यातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: September 24, 2023 15:49 IST2023-09-24T15:48:58+5:302023-09-24T15:49:11+5:30

शिंदखेडा पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Liquor bottle thrown on head of pantapari driver, incident in Shindkheda | पानटपरी चालकाच्या डोक्यात दारूची बाटली टाकली, शिंदखेड्यातील घटना

पानटपरी चालकाच्या डोक्यात दारूची बाटली टाकली, शिंदखेड्यातील घटना

धुळे - काही कारण नसताना हुज्जत घालून पानटपरी चालकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला दुखापत केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिंदखेड्यातील एका वाइन शॅापच्या बाहेर घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानटपरी व्यावसायिक दिनेश बळीराम माळी (वय ४३, रा. मारुती मंदिराजवळ, माळीवाडा, शिंदखेडा) यांनी फिर्याद दाखल केली. शिंदखेड्यातील अक्शू वाईन शॉप येथे गुरुवारी रात्री ९ वाजता काहीही कारण नसताना नाट्या उर्फ  समजविण्याचा प्रयत्न झाला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने नाट्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून दारूच्या काचेची बाटली काढली आणि माळी यांच्या डोक्यात टाकली. यात दिनेश माळी यांच्या डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाली.

माळी यांना गंभीर अवस्थेत सोडून नाट्या कापुरे हा घटनास्थळावरून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत दिनेश माळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी शिंदखेडा पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजता संशयित नाट्या उर्फ नरेश कापुरे याच्या विरोधात भादंवि कलम ३२६, ५०४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोहेकॉ. पवार करत आहेत.

Web Title: Liquor bottle thrown on head of pantapari driver, incident in Shindkheda