दिवा पडल्याने झोपडी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:20 IST2019-03-12T23:20:14+5:302019-03-12T23:20:36+5:30
वरखेडी : मदतीसाठी ग्रामस्थ धावले

दिवा पडल्याने झोपडी जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील वरखेडी येथे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करतांना पेटता दिवा पडल्याने आग लागून झोपडी जळून खाक झाल्याची घटना घडली. झोपडीत मजूर कालू रावसिंग भिल (वय २७) आणि दिलीप रावसिंग भिल (३३) हे दोघे बंधू आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दोघे भाऊ ऊसतोडीचे काम करतात. सोमवारीच गुजरात राज्यातून एक भाऊ आला होता. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी आगपिडीतांची मदत केली.