शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला कलाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:57 IST

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित । आई-वडिलांनंतर अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून मिळाला मोलाचा सल्ला

देवेंद्र पाठकधुळे : प्रथम माझे आई आणि वडील हे गुरु आहेत़ त्यांनी दिलेल्या खंबीर पाठींब्यामुळे आणि स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून मिळालेले मोलाचे मार्गदर्शन मला खूपच फायद्याचे ठरले असे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले़गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षक पंडित यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ त्यावेळी त्यांनी गुरुबद्दलचे महत्व अधोरेखित केले़पंडित यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथे झाले़ तर भोसला मिलीटरी स्कूल येथे माध्यमिक शिक्षण झाले़ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले़ अभ्यास करीत असताना आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात वळायचे याबाबत आई-वडिलांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले़ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे हक्काने त्यांच्याकडून सांगण्यात येत असल्याने मी जीवनाच्या वाटेवर खंबीरपणे उभा होता आणि आजही आहे़कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु होता़ अशातच मला एका नामांकित कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर नोकरी देखील मिळाली़ ती करीत असताना माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुच होता़ तिथे माझे मन लागत नव्हते़ नोकरी करायची म्हणून करीत होतो़ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच अविनाश धर्माधिकारी सरांशी भेट झाली़ त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळू लागले आणि माझ्या जीवनाला तिथून कलाटणी मिळाली़ परीक्षेच्या माध्यमातून माझ्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि पोलीस खात्यात रुजू झाल्याचा आनंद आहे़गुरुंचे स्थान जीवनामध्ये अबाधीत आहेच़ काय चांगले आहे, काय वाईट आहे, कोणती बाब चुकीची आहे हे गुरुकडून समजते़ त्याचे आकलन देखील वेळेवर झाले पाहीजे़ त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर आपण आपली वाटचाल निश्चित करायला हवी़ त्यांच्याकडून आलेला सल्ला हा अंतिम समजून त्यानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे़ गुरुंनी दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवायला हवा, असे मत चिन्मय पंडित यांनी व्यक्त केले़- आई आणि वडिल हेच प्रथम गुरु आहेत, हे कधीही कोणीही विसरु नये़- जीवनाच्या वाटेवर भेटणारे व कळत नकळत त्यांच्याकडून सल्ला हा मोलाचा ठरत असतो़- गुरुकडून आलेला सल्ला हा प्रमाणित करुन त्यानुसार मार्गक्रमण करायला हवे़- गुरुकडून मिळालेले मार्गदर्शन हे जीवनाच्या वाटेवर मोलाचे ठरणारे असते, हे लक्षात ठेवा़- आपल्या हिताचा निर्णय खंबीरपणे घेत असताना कधीही डगमगू नका़

टॅग्स :Dhuleधुळे