सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी व शेवटी सर्वसाधारण जागेचे आरक्षण काढण्यात आले. नम्रता युवराज कोळी या बालिकेने आरक्षित जागेचे सोडत काढली.
अनुुसूचित जाती आरक्षण-
टेकवाडे, रुदावली, भोरटेक, ताजपुरी व होळ हे ५ गावांची सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जमाती-
या गटात हिंगोणी बु., गरताड, कळमसरे, आमोदा, जापोरा, अजंदे बु., भोरखेडा, पाथर्डे खर्दे खुर्द, वनावल, तरडी, करवंद, टेंभे, जुने भामपूर, बाळदे, मांजरोद असे १५ गावांचे आरक्षण अनुसूचित जमातीकरिता काढण्यात आले.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
या प्रवर्गात गिधाडे, भाटपुरा, घोडसगाव, पिळोदा, बभळाज, विखरण, चांदपुरी, वाठोडा, मांडळ, असली तांडे, कुरखळी, सुभाषनगर, आढे, सावळदे, जातोडा, अहिल्यापूर, नवे भामपूर, भटाणे असे १८ ग्रामपंचायतींची सोडत ओबीसी प्रवर्गासाठी काढण्यात आली.
सर्वसाधारण प्रवर्ग
सर्वसाधारण प्रवर्गासाठी अजनाड, पिंप्री, त-हाडी, नांथे, उप्परपिंड, बलकुवे मुखेड, कुवे, वरूळ, भरवाडे, बोरगाव, शिंगावे, खर्दे बु., थाळनेर, तोंदे, सावेर गोदी, अंतुर्ली, साकवद, जवखेडा, खामखेडा, दहिवद, उंटावद, जैतपूर, वाघाडी, लोंढरे, अर्थे बु., अंजदे खुर्द, भावेर, पिंपळे, बाभुळदे, अर्थे खुर्द असे ३० ग्रामपंचायतींसाठी खुल्या जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तालुक्यातील ११८ पैकी ५० ग्रामपंचायतीं पेसा अंतर्गत समावेश झाल्याने अनुसूचित क्षेत्रात असल्यामुळे अनुसूचित जमातीकरिता राखीव करण्यात आल्या आहेत. त्यात नटवाडे, चाकडू, शेमल्या, हिंगोणीपाडा, जामण्यापाडा, लाकड्या हनुमान, न्यू बोराडी, रोहिणी, चिलारे, दुर्बड्या, भोईटी, गधडदेव, बुडकी, हिगाव, पनाखेड, मालकातर, हातेड, पळासनेर, हेंद्रयापाडा, कोडीद, बोरपाणी, सांगवी, निमझरी, लौकी, खामखेडा प्रआंबे, आंबे, जोयदा, वकवाड, नांदर्डे, चांदसे, जळोद, मोहिदा, झेंडेअंजन, हिवरखेडा, गु-हाळपाणी, सुळे, खैरकुटी, फत्तेपूर फॉरेस्ट, खंबाळे, महादेव दोंदवाडे, वरझडी, त-हाडकसबे, हाडाखेड, हिसाळे, बोराडी, वाडी खुर्द, उर्मदा, टेंभेपाडा, वाडी बु़, वासर्डी असे ५० ग्रामपंचायत पेसा अंतर्गत असल्यामुळे त्या राखीव आहेत.