थाळनेर भोरखेडा रस्त्यावर मजुरांची गाडी उलटली; २२ मजुर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:41 IST2023-08-14T11:32:51+5:302023-08-14T11:41:56+5:30
एका महिलेस जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आलेले आहे.

थाळनेर भोरखेडा रस्त्यावर मजुरांची गाडी उलटली; २२ मजुर जखमी
धुळे - शिरपूर तालुक्यातील थाळनेर - भोरखेडा रस्त्यावरील थाळनेर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरझाड नाल्याजवळ मजुरांची गाडी पलटी झाल्याने 22 मजूर जखमी झाल्याने २१ मजुर थाळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एक महिला जबर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर अशी की,थाळनेर - भोरखेडा रस्त्यावरील वरझाड नाल्या जवळ सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुजर घेऊन जाणारी गाडी पलटी झाल्याने २२ मजुर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एका महिलेस जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आलेले आहे.