रोहिणी नदीपात्रात केटीवेअर बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:11+5:302021-02-13T04:35:11+5:30

निजामपूर-साक्री रस्त्यावर रोहिणी नदीच्या पुलाखाली पूर्वेस नदीपात्रात के.टी. वेअरची मोठी साईट असून तेथे बंधारा बांधला तर त्याखालील शेतीस सतत ...

KTware should be constructed in Rohini river basin | रोहिणी नदीपात्रात केटीवेअर बांधावे

रोहिणी नदीपात्रात केटीवेअर बांधावे

निजामपूर-साक्री रस्त्यावर रोहिणी नदीच्या पुलाखाली पूर्वेस नदीपात्रात के.टी. वेअरची मोठी साईट असून तेथे बंधारा बांधला तर त्याखालील शेतीस सतत जलसिंचनाचा फायदा होईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. निजामपूर व जैताणे या दोन्ही गावांना पिण्याच्या पाणीप्रश्नी लाभ होऊ शकेल. शिवाय बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होईल. उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाई कमी होऊ शकेल. गुराढोरांना, मेंढ्या बकऱ्यांसाठी तेथे पाणी पिण्याची सोय होऊ शकेल. दीड दशकाआधीच हा बंधारा व्हावा म्हणून त्यावेळी जि.प. सदस्य चंदूलाल जाधव यांनी प्रयत्न केले. सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या कडे कुणीही लक्ष दिले नाही. ती मागणी तब्बल दीड दशकांपासून रखडली आहे.

जलसंसाधन मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देतांना निजामपूर रा.काँ. पार्टी शहर अध्यक्ष तैय्यबबेग मिर्झा, निजामपूर ग्रा.पं. सदस्य ताहिरबेग मिर्झा, आसीफ पठाण, ॲड. अजहर शेख, सज्जादबेग मिर्झा, मुजमिल मिर्झा, परवेज सैयद, सुनील बागले, रवींद्र मोरे, जावेद मिर्झा, दीपक देवरे,रमेश कांबळे असे मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

हे रोहिणी नदीचे कोरडे पात्र

पावसाळ्यात पूर येतात आणि पाणी वाहून जाते. या ठिकाणी के.टी. वेअर बांधण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: KTware should be constructed in Rohini river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.