शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
3
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
4
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
5
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
6
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
7
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
8
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
9
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
10
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
11
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
12
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
13
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
14
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
15
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
16
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
17
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
18
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
19
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
20
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:38 IST

मोराणे ते गोंदूर मार्ग : १ लाख २५ हजाराची होती रोकड

धुळे : सरवड गावानजिक ट्रकचालकाला लुटल्याची घटना ताजी असतानाच व्यापाºयाला चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखविण्यात आला़ त्यांच्याकडील १ लाख २५ हजाराची रोकड घेऊन दोघांनी पोबारा केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़देवपुरातील वाडीभोकर रोडवरील नेहरु नगरात राहणारे नंदकिशोर वेडू सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, सोनवणे यांचे होलसेल किराणा दुकान आहे़ होलसेल दुकान असल्यामुळे किराणा मालाचे उधारीचे १ लाख २५ हजार रुपये गोळा करुन एमएच १८ एआर ९९८७ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते़ साक्री रोडवरील मोराणे गावाच्या पुढे गोंदूर फाट्याजवळ दोन जणांनी त्यांची दुचाकी अडविली़ यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते़ अंधाराचा फायदा दोघांनी उचलला़ लूटीच्या तयारीत असलेल्या त्या दोघांनी त्यांचे चेहरे झाकलेले होते़ त्यांनी चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून झटापट करण्यास सुरुवात केली़ सोनवणे यांच्याकडे असलेली बॅग हिसकावून घेतली़ त्यानंतर सोनवणे यांना मारहाण करुन दुचाकीवरुन पळून गेले़ १ लाख २५ हजाराची रोकड त्यांनी लांबविली़ जबरी लुटीची ही घटना रविवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली़ भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या सोनवणे यांनी थेट धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली़लुटीच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक आऱ एस़ काळे, पोलीस उपनिरीक्षक के़ पी़ चौधरी, जे़ एऩ गोटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली़ घटनास्थळाचा पंचनामा करुन लूट करणाºया दोघांचा शोध घेतला जात आहे़याप्रकरणी नंदकिशोर सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़दरम्यान, सरवड गावाजवळ ट्रकचा पाठलाग दोघांनी केला़ ट्रक थांबवून चालकाला मारहाण करण्यात आली होती़ ही घटना ताजी असतानाच पुन्हा दोन जणांनी गोंदूर फाट्यावर लूट केल्याचे समोर आले आहे़ घरफोडीचे सत्र संपले असतानाच आता जबरी लुटसारख्या घटना घडत असल्यामुळे अशा लूट करणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी