न्याहळोदला कीर्तन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:01 IST2019-07-30T12:01:07+5:302019-07-30T12:01:24+5:30
सावता महाराज पुण्यतिथी : नामवंतांचे कीर्तन

न्याहळोद येथील सावता महाराज मंदिरात कीर्तन सप्ताहनिमित्त करण्यात आलेली सजावट.
न्याहळोद : येथे संत सावता पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह सोहळा नुकताच सुरू झाला असून ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने किर्तनाचा आस्वाद घेत आहेत.
२५ जुलैपासून कीर्तन सप्ताह प्रारंभ झाला असून १ आॅगस्ट गुरुवार रोजी काल्याचे कीर्तन होणार आहे. परमपूज्य कै.ह.भ.प. कृष्णाजी माऊली जाय खेडकर यांच्या आशीवार्दाने, ह.भ.प. साहेबराव गुरुजी धुळेकर व ह.भ.प. जनार्दन महाराज पिंपरीकर, ह.भ.प. योगेश महाराज वरझडीकर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रोज पहाटे पाच ते सहा काकड आरती, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा कीर्तन सप्ताहाचे आयोजन होत आहे. त्यात ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसरे, ह.भ.प. रवींद्र महाराज तारखेडा, ह.भ.प. उमेश महाराज दहिवद, ह.भ.प. दीनानाथ महाराज तरवाडे, ह.भ.प. सावता महाराज वसेकर, ह.भ.प. गजानन महाराज चौगाव, ह.भ.प. तुकाराम महाराज मेहून मुक्ताईनगर व गुरुवार १ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होणार आहे.
काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.