शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत बैठकीत काथ्याकूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

शहराला उन्हाळ्याच्या दिवसात पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असतो. यासाठी तापी योजनेच्या बाभळे जलशुद्धीकरण येथील कॅरी पॅक्युलेटरचा गाळ काढणे व ...

शहराला उन्हाळ्याच्या दिवसात पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असतो. यासाठी तापी योजनेच्या बाभळे जलशुद्धीकरण येथील कॅरी पॅक्युलेटरचा गाळ काढणे व अन्य अनुषंगिक कामे आवश्यक होती. अशा प्रकारचे काम हे पाण्याचा स्रोत कमी झाल्यावरच करता येते. सद्य:स्थितीत पाण्याचा स्रोत कमी झाल्याने काम हाती घेण्यात आले. यात शुद्धीकरण केंद्राचा गाळ काढणे, बाभळे ते एमबीआर पाइपलाइनवरील लिकेज काढणे, पारोळा चौफुलीवरील १ हजार ५०० एमएमच्या लाइनवरील दोन मोठे लिकेजेस् काढणे, दोन ठिकाणी एअरव्हॉल वेल्डिंग करणे अशी काही महत्त्वाची कामे पार पाडण्यात आली. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत सूचित केल्याप्रमाणे ९ तारखेला पाणीपुरवठा रात्री बंद करून सलग ३६ तास काम करण्यात आले. यात पाणी वितरणात दोन दिवसांचा गॅप निर्माण झाला. त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विविध त्रासांना सामोरे जावे लागले. त्यानंतर देवपूर विभागात आणि शहरात पाणीपुरवठा करण्यात आला.

सध्याच्या स्थितीत शहरातील पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. पाणी वितरण व्यवस्थेतील वेळ कमी करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. पहाटेपासूनच सर्व अभियंता यांना पाणी वितरणाच्या कालावधीत प्रत्येक जलकुंभावरील वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वेळ कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी क्रॉस कनेक्शन करणे, आवश्यक त्या ठिकाणी व्हॉल्व बसविणे, तसेच पांझरा पम्पिंग स्टेशन येथील ७५ एचपी पंप सुरू करणे, त्यावरून देवपूर भागात पाणीपुरवठा करणे अशी काही कामे युद्धपातळीवरून हाती घेण्यात आलेली आहेत.

१३६ कोटी योजनेत नव्याने बांधण्यात आलेले जलकुंभ कार्यान्वित करण्यासाठी तसेच अक्कलपाडा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व महापालिकेचे अभियंता यांची एकत्रित बैठकदेखील घेण्यात आली. यात नवीन जलकुंभाचे टेस्टिंग घेणे, त्यासाठी क्रॉस कनेक्शन टाकणे व जलकुंभ सुरू करणे याविषयी निर्णय घेण्यात आला. अक्कलपाडा योजनेतील जॅकवेलचे काम व ब्रिजचे काम तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले. तसेच दोन अ‍ॅप्रोच पाइपलाइन टाकणे व अन्य अनुषंगिक कामे पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.