शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

धुळ्यातील कबीरगंजची घरफोडी आठवड्यातच उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:08 PM

१ लाख ८७ हजारचा ऐवज : तिघांना अटक

ठळक मुद्देशहरातील कबीरगंज भागातील घटनाआठवड्यातच शोधले चोरट्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील कबीरगंज भागात घरफोडी करुन १ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास करणाºया तिघा चोरट्यांना मुद्देमालासह अवघ्या आठवड्याभरात चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले़ चोरट्यांकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ महफुजूल हसन शब्बीर अहमद हे ७ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या आई-वडील यांना घेऊन मुंबईला गेले होते़ त्यांचे आई-वडील हजयात्रेसाठी गेल्यानंतर ९ रोजी ते घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्याने घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ४० हजाराची रोकड सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८७ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला़ याबाबतची फिर्याद अहमद यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला दिली होती़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, कर्मचारी शंकर महाजन, जोएब पठाण, प्रेमराज पाटील, मुक्तार शहा, मुक्तार मन्सुरी, संदीप कढरे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयित फिरोज शेख अब्दुल कलाम, मोहम्मद शाहीद मोहम्मद हानीद, शरीफ सईद सादीक (सर्व रा़ कबीरगंज, धुळे) यांना पथकाने ताब्यात घेतले आहे़ त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले़ चोरट्यांकडून १० हजार रुपयांची रोकड, १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, २० हजार रुपये किंमतीच्या घड्याळी आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २९ हजार ७२८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस