खुडाणे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:05 PM2019-09-20T22:05:41+5:302019-09-20T22:06:01+5:30

विविध विषयांवर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना गणवेश, दफ्तरांचे वाटप

Joint Education Conference of the Khodane Center | खुडाणे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद

dhule

Next

जैताणे : साक्री तालुक्यातील खुडाणे केंद्रातील जि.प. शाळा, वाजदरे व निजामपूर केंद्रातील जि.प. उर्दू शाळा निजामपूर व जैताणे यांची संयुक्त बीटस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी क्वॉॅलिटी सोशल ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद भार्गव यांनी वाजदरे शाळेतील १६१ विद्यार्थ्यांना ४९ हजार रुपयांचे स्पोर्ट ड्रेस वाटप केले. अर्णव इंडस्ट्रीजचे संचालक विजय होळकर यांनी वाजदरे शाळेतील १६१ विद्यार्थी व निजामपुर, एैचाळे उर्दू शाळेतील ९० विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांचे दप्तर वाटप केले. महालक्ष्मी इंडस्ट्रीज, सुरतचे संचालक विलास सोनवणे व भिकन जयस्वाल यांनी शाळेला इन्वर्टर भेट दिले. तसेच एस.बी.आय. शाखा अधिकारी सचिन जाधव यांनी वाजदरे व उभरांडी शाळेला संगणक संच जाहीर केले. माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे यांनी पाच हजार रुपये किंमतीचा अभ्यासक्रम देण्याचे जाहीर केले. निजामपूर ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी यांनी पाच हजार शंभर रुपयाची वस्तू देण्याचे जाहीर केले.
निजामपूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. सचिन शिरसाठ यांनी सुरक्षिततेविषयी व अफवांवर विश्वास ठेवू नये यासंबंधी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. एस.बी.आय.चे शाखाधिकारी सचिन जाधव यांनी बँकेच्या विविध योजना व व्यवहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षकांचे एस.जी.एस.पी. खाते, विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स खाते, शेतकऱ्यांच्या विविध योजना याविषयी विद्यार्थी, पालक शिक्षक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे यांनी परिसरातील आदर्श शिक्षक संगीता पाटील वासखेडी, रामचंद्र भलकारे खुडाणे, पावबा बच्छाव वाजदरे यांचा गौरव केला. प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांचा विविध उपक्रमाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. पावबा बच्छाव यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सुमनबाई सोनकर व काशिनाथ सोनकर यांच्यासह व्यासपीठवरील प्रमुख पाहुण्यांनी नागरी सत्कार केला. भामेर जि.प. शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज जाधव यांचा पी.एच.डी प्राप्त केल्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी निजामपूरचे माजी सरपंच विजय राणे, माजी उपसरपंच ताहीरबेग मिर्झा, ज्ञानेश्वर पवार, आमखेलच्या सरपंच सुमनबाई सोनकर, गटनेते काशिनाथ सोनकर, जैताणे ग्रामपंचायत गटनेते, पिंटू पगारे, परेश वाणी, साक्री शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष विनोद खैरणार, किशोर वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एस खर्डे, निजामपूर बीट केंद्रप्रमुख शोभा देसले, सुनील जाधव, गणेश सोनवणे, किरण बेडसे, पदोन्नती मुख्याध्यापक विलास सोनवणे, साक्री तालुका शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत लकडे, सागर वाकसे, किशोर कोकणी, साहेबराव पिसाळ, विलास पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र देसले यांनी केले. सूत्रसंचालन पावबा बच्छाव यांनी केले. आभार प्रकाश बच्छाव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अलमास शाह, अजहर शेख, इम्रान अन्सार, सावता बोरसे, बंडू मोरे, प्रकाश देवरे, उषा भामरे, इंद्रसिंग चौरे, पावबा बच्छाव, अंगणवाडी शिक्षिका, स्वयंपाकीण, मदतनीस, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, वाजदरे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Joint Education Conference of the Khodane Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे