शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद ...

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही ‘अ’ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील तेथे इतर सहकारी संस्थेस ‘ब’ वर्ग सभासद करून खरेदीचे काम देण्यात येईल. मात्र, ही संस्था किमान दोन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजर समिती, एफपीओ यांनाही केंद्र देता येते.

खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधन सामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला, मॉईश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक चालविण्याची क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळण्याकरिता प्रशिक्षित असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा. पुढील बाबींकरिता सहायक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. त्यात वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असण्याबाबत, अन्नधान्य कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी-विक्रीचा किमान एक वर्षाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळ्या यादीत, अपहार, फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

संस्थेने द्यावयाच्या कागदपत्रांमध्ये मागील तीन वर्षांचे सनदी लेखापाल/शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत. पॅनकार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे दहा लाख रुपयांचे खेळते भांडवल असल्याबाबतचे बँक प्रमाणपत्र/बँक पासबुक नोंद (ज्या संस्थेला पणन महासंघाकडून अनुषांगिक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करण्यात यावा), आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चिती केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (ॲफेडेव्हिट), संस्थेकडून खरेदी-नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र.

जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी द्यावयाची प्रमाणपत्रे, मागील वर्षीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये ऑफलाइन खरेदी, गैरव्यवस्थापन न केल्याबाबतचा दाखला, खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, ‘अ’ किंवा ‘ब’ वर्ग सभासद आहे किंवा नाही, नसल्यास ‘ब’ वर्गाचा प्रस्ताव सादर केला आहे काय आदी.