वधु-वरांचे परिचय मेळावे काळाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:53 IST2019-11-25T22:53:02+5:302019-11-25T22:53:41+5:30
भोई समाजासह मराठा समाजाचा पुढाकार : अनेकांनी करुन दिला आपला परिचय

Dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : झपाट्याने काळ बदलत असून दिवसेंदिवस महागाई देखील वाढत आहे़ या अनुषंगाने एका व्यासपिठावर येऊन उपवर-वधूंचे मेळावे होत असल्याने ही कौतुकास्पद बाब आहे़ ती आता काळाची गरज असल्याचे मत भोई समाज आणि मराठा समाजाच्या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले़ अनेकांनी आपला परिचय करुन देत असताना पालकांनी देखील आपल्या पाल्याचा परिचय करुन दिला़
भोई समाज
अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ, पुणे शाखा धुळे यांच्यावतीने मनोहर टॉकिजजवळील केशव गार्डन येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता़ यात २३० मुले आणि २५० मुलींसह घटस्फोटीत, विधवा व अपंग अशा ३० अशा एकूण ५१० उपवर-वधूंनी आपला परिचय करुन दिला़ यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, भोई समाज प्रदेशाध्यक्ष हिरामण मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा फुलपगारे, जिल्हा सचिव तुळशिराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास फुलपगारे, महानगराध्यक्ष विश्वनाथ फुलपगारे, ब़ ना़ फुलपगारे, भास्कर फुलपगारे, नारायण फुलपगारे, रामदास फुलपगारे, सुमन फुलपगारे, केशर फुलपगारे यांच्यासह अन्य उपस्थित होते़
मराठा सेवा संघ
मराठा सेवा संघ संचलित मराठा समाजातील उपवर-वधूंसह पालकांचा परिचय मेळावा शहरातील गरुड वाचनालयाच्या शिंपी सभागृहात रविवारी घेण्यात आला़ यावेळी माजी शिक्षणाधिकारी एस़ के़ वानखेडे, वधू-वर कक्षाचे अध्यक्ष बी़ टी़ देवरे, प्राचार्य व्ही़ के़ भदाणे, एस़ एम़ पाटील, लहू पाटील, प्रा़ वाय़ एऩ साळुंखे, प्रा़ उषा साळुंखे, पी़ सी़ पाटील, घोगरे यांच्यासह अन्य उपस्थित होते़ मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रा़ भगवान बोरसे यांनी केले़ मेळाव्यात १७८ उपवर-वधूंनी आपला परिचय करुन दिला़
यात सुमारे १५ ते २० जणांचा विवाह जमण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली़ दिवसभर कार्यक्रम सुरु होता़