शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेत ४० अनुकंपधारकांच्या घेतल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:44 IST

शैक्षणिक अहर्तेनुसार विविध विभागांमध्ये दिली जाणार नियुक्ती

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषदेत असलेल्या रिक्त जागांवर अनुकंपधारकांना सामावून घेण्यासाठी ४० अनुकंपधारकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. दरम्यान नियुक्तीपत्रासाठी अनुकंपाधारक सायंकाळपर्यंत थांबलेले होते. मात्र बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात येतील असे त्यांना सांगण्यात आले.धुळे जिलह्यातील अनुकंपाधारक गेल्या ८- ते १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. वित्त विभागाच्या ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहे, आणि ज्या पदाच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट-क व गट-ड मधील प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या २० टक्के पदे ही अनुकंपाधारकांना देण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या ४ फेब्रुवारी २०२०च्या पत्रानुसार अनुकंपाधारकांना ४५ दिवसाच्या आत नियुक्ती देण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे ही नियुक्तीप्रक्रिया बरीच लांबली.दरम्यान अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र देण्यात यावीत या मागणीसाठी १६ सप्टेेंबर रोजी अनुकंपधारकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली होती. यापैकी काहींनी सीईओंना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान आज जिल्हा परिषदेत ४० अनुकंंपधारकांना मुलाखत व समुपदेशनासाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांनी अनुकंपधारकांची मुलाखत व कागद पत्रांची पडताळणी केली. यावेळी या अनुकंपधारकांना शैक्षणिक अहर्तनुसार जिल्ह्यात असलेल्या रिक्त जागा स्क्रीनवर दाखविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अनुकंपाधारकांमुळे जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.