शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागातून आंतरराज्य बससेवेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:26 IST

मध्यप्रदेशसाठी अद्याप बसेस सुरू झालेल्या नाहीत

आॅनलाइन लोकमतधुळे: आंतरजिल्हा पाठोपाठ आता आंतरराज्य बससेवा सुरू करण्यास एस.टी.महामंडळाने हिरवा कंदिल दिला असून, १४ सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावर सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमिवर दक्षता म्हणून मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून येणाऱ्या बससेवा २० मार्चपासून बंद झालेली होती. त्यानंतर धुळे आगारातून मध्यप्रदेश व गुजरातमध्ये जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र २३ मार्चपासून देशातच लॉकडाऊन सुरू झाल्याने, सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली होती.त्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात २० मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली होती. मात्र या बससेवेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. तर २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. ई-पास शिवाय सुरू झालेल्या या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशी बसवले जात आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्याच्या २४ दिवसानंतर आता आंतरराज्य बससेवा सुरू करण्यास एस.टी. महामंडळाने परवानगी दिलेली आहे.धुळे विभागातून १४ रोजी गुजरातमधील सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आली. पहिली बस दोंडाईचा आगारातून सकाळी ६.३० वाजता सुरतसाठी सुटली. ही बस अक्कलकुवामार्गे जाईल. दुसरी बस शिरपूर आगारातून सकाळी ७ वाजता सुटेल. ही बस शिंदखेडा मार्गे जाईल. तर सकाळी ८ वाजता धुळे-सुरत ही बस सुटेल ही बस साक्री, नवापूरमार्गे सुरतला जाणार आहे. पहिल्याटप्यात सुरतसाठीच बस आहे.दरम्यान प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा घेतल्यानंतर पुढील आठवड्यापासून विभागातून वापी, बडोदा, अहमदाबाद, अंकलेश्वर या मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहे. गुजरातसाठी बससेवा सुरू झाली तरी मध्यप्रदेशसाठी अद्याप बसेस सुरू झालेल्या नाहीत.

टॅग्स :Dhuleधुळे