तानाजी चित्रपटातून समाजाचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:14 IST2020-01-20T23:14:09+5:302020-01-20T23:14:45+5:30

निवेदन : नाभिक समाजाचे निदेर्शने

 Insulting the society from the film Tanaji | तानाजी चित्रपटातून समाजाचा अपमान

Dhule


धुळे : शिवचरित्रावर आधारीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तानाजी या मराठी चित्रपटात नाभिक समाजाचा खोटा इतिहास दाखवून अपमान केला आहे़ चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल जिवा सेना जिल्हा प्रशासनाला देण्यात आला़
या चित्रपटात नाभिकांचे काल्पनिक न नकारात्मक पात्र दाखवुन एका सुभेदाराकडून नाभिक समाजाचा अपमान होईल असे जातीवाचक अपमानास्पद चित्रण केले आहे़ मुळ इतिहासात चुलत्या हे नाभिक समाजाचे पात्र नसतांनाही तशा प्रकारचे काल्पनिक पात्र दाखवुन अपमान केला आहे़़
तानाजी चित्रपटातून वादग्रस्त भाग काढण्यात यावा, अशा मागणी जितेंद्र बोरसे, सुधिर महाले, गणेश ठाकरे, राहूल सुर्यवंशी , अमृत महाले, सुधीर महाले आदींनी केली आहे़़

Web Title:  Insulting the society from the film Tanaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे