शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

पाणीसाठ्याचा वापर करून सिंचन क्षेत्र वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:56 PM

शिरपूर : रब्बी हंगाम पूर्व सिंचन आढावा बैठकीत सहाय्यक अभियंता एस.एस.शिंदे

शिरपूर : तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरले असल्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगला घेता येऊ शकेल़ त्याकरीता लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या पाण्याचा वापर करून सिंचन क्षेत्र वाढविण्यात यावे, असे प्रतिपादन येथील पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस़एस़ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले़सन २०१९-२० ची रब्बी हंगामपूर्व सिंचन बैठक चाकूड येथे घेण्यात आली़ तालुक्यात यंदा सरासरीच्या दुपटीने पाऊस झाल्यामुळे सर्व लघु प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरले आहेत़ या पार्श्वभूमिवर नांदर्डे, कालीकराड, रोहिणी, खामखेडा, लौकी, जळोद, विखरण, वाडी, बुडकी, मिटगांव, गधडदेव व वकवाड या प्रकल्पअंतर्गत असलेल्या लाभार्थी शेतकºयांना पूर्व सिंचनाची माहिती मिळावी याकरीता बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस़एस़ शिंदे म्हणाले, शासनाचा पाण्याचा दर अत्यल्प असल्याने तालुक्यात या संधीचा लाभ घेऊन सिंचन क्षेत्र वाढवावे़ तसेच विभागातील सिंचन वसुली देखील वाढवावी, असे सांगितले़ या प्रकल्पाच्या पाण्यामुळे शिरपूर तालुक्यात ६ ते ७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्यामुळे गहू, हरभरा, दादर व इतर कडधान्यांना त्याचा लाभ होतो़या बैठकीस शाखा अभियंता सी़पी़ धाकड, टी़आऱ दोरीक, भागवत पाटील, सुक्राम वेस्ता पावरा, सत्तारसिंग नारखा पावरा, पंडीत झुंझार पावरा, रूपजा भाया पावरा, आत्माराम पावरा, दिवाणसिंग पावरा, माधव आनंदा पाटील, अशोक आनंदसिंग राजपूत, सुकलाल किसन पावरा, देविदास पुंडलिक कोळी, हिरालाल चिंतामण तिरमले, मुरलीधर आत्माराम पाटील यांच्यासह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी शेतकºयांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे