लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरात पडून असतांना शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच आहे. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट असतांना तब्बल २ लाख २५ हजार ५०६ हेक्टरवर पेरणी झाली असून, लागवडीची टक्केवारी १०७ टक्के आहे. त्याखालोखाल मका, बाजरीची लागवड झालेली आहे. तर नागलीची लागवडच झालेली नाही.जिल्ह्यात गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे त्याचा फायदा यावर्षी होऊ लागला आहे. कृषी विभागाने २०२०-२१ या खरीप हंगामासाठी ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केलेले आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस पडत असल्याने, जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड झालेली आहे.कापूस लागवडीला प्राधान्यगेल्या काहीवर्षात कापसाला भाव मिळत नसला, तसेच अद्यापही कापूस विकला गेलेला नसला तरी शेतकºयांचे पांढरे सोने समजले जाणाºया कापूस लागवडीकडेच शेतकºयांचा सर्वाधिक कल दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा लागवड जास्त झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कापूस लागवडीचे क्षेत्र २ लाख २३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र निर्धारित केली असतांना, आतापर्यंत २ लाख २५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. लागवडीची ही टक्केवारी १०७ टक्के आहेत.मका लागवडकापूस खालोखाल मक्याची लागवड जिल्ह्यात कापूस खालोखाल मक्याची लागवड झालेली आहे. ५९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रापैकी ५० हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. तर बाजरीचे क्षेत्र ५७ हजार ५२१ हेक्टर असतांना ३६ हजार ३७८ क्षेत्रावर लागवड झालेली आहे. तुरीचे क्षेत्र १८ हजार ९२५ क्षेत्र असतांना आतापर्यंत १५ हजार ७४६ क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली आहे.नागलीची लागवडच नाहीजिल्ह्यात १ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र नागलीची लागवडच झालेली असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:22 IST