स्वप्नील बांदोडकरांच्या मधुर चैतन्यमय स्वरात शिवगान स्पर्धेचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 22:55 IST2021-02-09T22:55:03+5:302021-02-09T22:55:35+5:30

जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनांच्या जल्लोषात, तुतारीच्या गगनभेदी स्वर

Inauguration of Sivagan competition in the melodious spirit of Swapnil Bandodkar | स्वप्नील बांदोडकरांच्या मधुर चैतन्यमय स्वरात शिवगान स्पर्धेचे उदघाटन

स्वप्नील बांदोडकरांच्या मधुर चैतन्यमय स्वरात शिवगान स्पर्धेचे उदघाटन

धुळे : जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनांच्या जल्लोषात, तुतारीच्या गगनभेदी स्वर व या सर्वांच्या साथीला राधा ही बावरी, गालावर खळी फेम स्वप्नील बांदोडकरचा कर्णमधुर आवाज हे सर्व सुर एकाच मंचावर दिग्गज कलावंताच्या उपस्थित जुळून आले़ ते ठिकाण होते छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर व अवचित्य होते शिवगान स्पर्धेचे़
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ धुळे जिल्हा व ग्रामीणच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठीतील सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर, चित्रपट अभिनेत्री प्रेमाकिरण यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, व भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या स्पर्धचे उदघाटन करण्यात आले. या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष बेंडाळे, जयश्री अहिरराव, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, स्नेहल जाधव, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, जेष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, महिला जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी अमृता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्रतर्फे ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शिवगान स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी घेण्यात आली व या स्पर्धेतील विजेत्यांना १९ फेब्रुवारी रोजी सातारा येथे अजिंक्यतारा वर होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

Web Title: Inauguration of Sivagan competition in the melodious spirit of Swapnil Bandodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे