तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; शिरपूर तालुक्यातील गरताड येथील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 17, 2023 18:12 IST2023-04-17T18:12:38+5:302023-04-17T18:12:53+5:30

शिरपूर तालुक्यातील गरताड शिवारात हॉटेल सनी गार्डनच्या पुढे दारूचे बिल भरण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला. 

 In Gartad Shivara of Shirpur taluka, two friends had an argument over payment of liquor bill in front of Hotel Sunny Garden  | तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; शिरपूर तालुक्यातील गरताड येथील घटना

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; शिरपूर तालुक्यातील गरताड येथील घटना

धुळे: शिरपूर तालुक्यातील गरताड शिवारात हॉटेल सनी गार्डनच्या पुढे दारूचे बिल भरण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला. संतापलेल्या तरुणाने मित्राच्या पाठीवर चाकूने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद थाळनेर पोलिसात करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील सागर सुरेश कोळी (वय २३) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सागर आणि त्याचा मित्र दोघेही दारू पिण्यासाठी गेले होते. 

दारू पिल्यानंतर माझे दारूचे बिल भर असे सांगितल्याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर चाकू काढून त्याने हल्ला केल्याने सागर याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर मारेकऱ्याने तेथून पळ काढला. गंभीर अवस्थेत पडून असलेल्या सागर कोळी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सागर कोळी याने थाळनेर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार रविवारी दुपारी १ वाजता भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करत आहेत.

 

Web Title:  In Gartad Shivara of Shirpur taluka, two friends had an argument over payment of liquor bill in front of Hotel Sunny Garden