शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या बदल्यात सावकाराने केली महिलेकडे शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:31 IST

१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : घेतलेले पैसे व्याजासह परत करावे यासाठी एका तरुण दाम्पत्याला काठीने मारहाण करीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण, शिवीगाळ व दमदाटीचा हा प्रकार गेल्या दाेन वर्षांत वेळोवेळी घडला.  

याप्रकरणी पीडित तरुणाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी सुमारास फिर्याद दाखल केली.  पीडित तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते. त्यानंतर दिलेले पैसे हे व्याजासह परत करावे, अशी मागणी करून तरुणाला वेळोवेळी शिवीगाळ केली जात होती. फोनवरून धमकी दिली जात होती. हा सर्व प्रकार ६ ऑक्टोबर २०२० ते २५ मार्च २०२२ या कालावधीत वेळोवेळी घडत होता.   २५ मार्च रोजी तरुणासह त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. ती गर्भवती असल्याने तिच्या होणाऱ्या बाळाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जितेंद्र बैसाणे, समीर गवळी, कल्याण गरुड यांनी पत्नीशी फोनवरून शारीरिक सुखाची मागणी केल्याचे  तक्रारीत म्हटले आहे.  त्यानुसार, जितेंद्र बैसाणे, कल्याण गरुड, समीर गवळी, मिलिंद चौधरी, स्वप्नील जयस्वाल, दिनेश कोळी, ललित पंढरीनाथ पाचोरे, पिंटू बैसाणे, विजय देसले, राेहित ऊर्फ बंटी पहेलवान (सर्व रा. धुळे), ज्योती तमाईचे, अशोक शिरसाठ (दोघे रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) यांच्याविरोधात सावकारी अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाPoliceपोलिस