शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अवघड क्षेत्रातील १४ शाळा भरतात झोपडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:10 IST

शिरपूर तालुक्यातील स्थिती : मुख्य रस्त्यापासून चार-पाच कि.मी.दूर, पावसाळ्यात होतात सर्वाधिक हाल 

सुनील साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात अवघड क्षेत्रातल्या ३३ जिल्हा परिषद मराठी शाळांना तक्तालीन सीईओंनी सर्व्हे करून मंजुरी देण्यात आलेली होती़ परंतु त्यामधून १९ शाळा कुठलाही सारासार विचार न करता वगळण्यात आल्यामुळे फक्त १४ शाळांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे डोंगर-दºयातील व त्या शाळांना ये-जा करण्यासाठी रस्ता, भौतिक सुविधा नसतांनाही वगळण्यात आलेल्या १९ शाळांमधील शिक्षकांवर अन्याय झालेला आहे़ वगळलेल्या शाळा कोणत्या कारणांमुळे रद्द केल्या, ते मात्र सांगण्यात आलेले नाही़ १४ शाळांमध्ये पोहचणेही कठीण आहे. पावसाळ्यात सर्वाधिक हाल होतात. जून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करून ३३ शाळांची यादी मंजूर केली होती़ त्यात या तालुक्यातील अंबडपाडा-सामºयापाडा, एकलव्यपाडा-बोराडी, धाबादेवीपाडा- सलईपाडा, विद्यानगर-टेंभेपाडा, वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपूरापाडा-मालकातर, नवादेवी, उमरपाडा-चाकडू, धरमपूरापाडा- गधडदेव, विकलापाडा- मालकातर, इंगन्यापाडा-फत्तेपूर फॉरेस्ट, रोषमाळ, रामपूर, कढईपाणी-उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, बिकानेर-हाडाखेड, कुंडीपाडा-खैरखुटी, शेकड्यापाडा-खैरखुटी, काकडमाळ, थुवानपाणी-गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, नोटूपाडा-हिगांव, कौपाटपाडा-हिगांव, नवापाडा-लाकड्या हनुमान, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर, सातपाणीपाडा-महादेव दोंदवाडे, न्यु सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश होता़ या गावातील शाळांमध्ये ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४-५ किमी अंतरावर असून तेथे जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते़ कुठलेही वाहन जात नाही, खडकळ रस्ता, नदी-नाल्यातून जावे लागते, पावसाळ्यात तर ये-जा करणे शक्य नाही़ पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो, विजेची सोय नाही तसेच भौतिक सुविधांपासून तेथील ग्रामस्थ वंचित राहतात़ अशाही परिस्थितीत तेथे झोपडीवजा घरात ज्ञानदानाचे काम केले जाते़ अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारणपणे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहचण्यास सोईसुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल असलेली गावे ही अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जातात असा अध्यादेश आहे़ या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली करतेवेळी प्राधान्य दिले जाते़ किमान त्याने ३ वर्षे त्या भागात नोकरी केली पाहिजे असे शिक्षकांना अधिक लाभ होतो, भविष्यात या शिक्षकांना आर्थिक व इतर लाभ देखील मिळू शकणार आहेत़ पेसा अंतर्गत आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली आहे, त्याप्रमाणे भविष्यात या शिक्षकांना देखील लाभ होवू शकणार आहे़त्यामुळे आता फक्त या तालुक्यातील १४ शाळेतील शिक्षकांनाच लाभ मिळणार आहेत़ त्यात वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपूरापाडा- मालकातर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, थुवानपाणी- गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर,  न्यु सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश आहे़उर्वरीत १९ शाळांना वगळण्यात आल्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ त्याही शाळा डोंगरदºयात असतांना नेमके कोणत्या कारणामुळे वगळ्यात आल्या त्याचा खुलासा करावा अशा आशयाचे निवेदन सीईओंना देण्यात आले आहे़ मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही़शासनाच्या धोरणामुळे आदिवासी मुलांची शिक्षणाची गैरसोय नको म्हणून शाळांना मंजूरी दिली जाते़ गावातील ग्रामस्थांच्या मदतीनेच झोपडीवजा खोली मुलांसाठी सजली जाते़ मुले अ-ब-क-ड़़़ गिरवू लागतात, गाणी म्हणू लागतात, त्याच झोपडीत कुटुंबांची रेलचेल़़़ कोंबड्यांची पिलावळ तर कधी सापाचे दर्शनही घडते़  आज ना उद्या आपल्या गावात शाळेची टुमदार इमारत होईल असे स्वप्न साºयांचेच, परंतु ८-१० वर्षे झाली तरी या मुलांचे दिवस मात्र झोपडीतच काढावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले़ दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छता गृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही़ प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा पुरविण्याच्या जाहीराती पाहून धन्य वाटते, परंतु असे वास्तव देखील आहे हे कळाल्यावर मात्र शासन किती निष्ठूर आहे याची जाणीव होते़ पाऊस आला म्हणजे काय हाल होत असतील कोण जाणे! तेथील गुरूजनांची होणारी परवड लक्षात घेण्याजोगी आहे़ शाळा वर्ग खोली, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, स्वयंपाकगृह आदी भौतिक सुविधा नसल्याने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होतांना दिसते़घरात अठराविश्व दारिद्रय असलेल्या आदिवासी मुलांच्या जीवनात शाळा हाच बंगला़़़ मनमोहक जागा़़़ प्रगतीची दारे सारे काही असतांना गुणवत्तेचा आग्रह धरण्याअगोदर अशा शाळांना भौतिक सुविधा द्याव्यात़ जेणेकरून मुलांचे मन तेथे चांगल्या प्रकारे रमेल. अन्यथा मुलांचे भविष्य अंधारातच राहील व त्याचे पाप हे शासनाच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही़कौपाटपाडा येथे शाळेसाठी जागा मंजूऱ़़४हिगांव ग्रामपंचायत अंतर्गत असलेली कौपाटपाडा येथे गावाने गावठाणची १८५ चौमि जागा शाळेसाठी मंजूर केली आहे़ मात्र हा पाडा अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे येथे बांधकामास मंजूरी मिळत नाही़ या ठिकाणी १ ते ४ वर्ग असून १२ मुले-मुलींना शिक्षण देण्याचे काम दोन शिक्षक करतात़ सदर शाळा सन २०१२ पासुन सुरू केलेली असून झोपडीवजा खोली शाळा भरते़४शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा असून त्यापैकी कौपाटपाडा, टिटवापाणी, खुंटमळी, पिरपाणी, काईडोकीपाडा, सोज्यापाडा, सातपाणीपाडा, चिंचपाणी, रोलसिंगपाडा या शाळांना ८ वर्षापासून मंजुरी मिळाली असतांना अद्यापपर्यंत इमारत नाही़ सद्यस्थितीत मुले उघड्यावर शिक्षण घेत आहेत़ या शाळांना २००७-८ मध्ये वर्ग खोल्या बांधकामासाठी देखील निधी मंजूर झाला होता, परंतु या शाळा अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे बांधकामास परवानगी मिळाली नाही़ त्यामुळे आलेला निधी परत पाठवावा लागला आहे़ याठिकाणी १ ते ४ वर्ग असून झोपडीवजा खोलीत त्यांची तात्पुरती सुविधा करण्यात आली आहे़ सन २०१५-१६ मध्ये देखील मालपूरपाडा, प्रधानदेवी, शेकड्यापाडा, न्यु सातपाणी व भूपेशनगर या शाळांना मंजूरी मिळाली असून याही ठिकाणी इमारत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे