शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो, धुळेकर नागरिकांची मनपाला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री ...

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री तर झुंडीत हे श्वान फिरत असतात. त्यामुळे परिसरात रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. ‘या श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो’, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील भटक्या श्वानांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले, तेव्हा कॉलनी परिसरात हा प्रश्न रात्री खूपच त्रासदायक बनल्याचे दिसून आले. कॉलनीत रात्री ११ वाजल्यानंतर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. कारण कॉलनीच्या रस्त्यावर रात्री श्वानांचेच राज्य असते. हे श्वान रात्री दुचाकीवरुन येणाऱ्यांच्या मागे लागतात, तेव्हा दुचाकीस्वार हा श्वानापासून वाचण्यासाठी वेगाने गाडी चालवतो. यामुळे अपघात होण्याची भीती असते आणि रात्री असे अपघात झालेही आहेत. त्यात काहीजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत.

रोगट श्वान - शहरात त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरडयावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पाेटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो. यामुळे काही श्वान तर अगदीच विद्रुप दिसतात. अशा श्वानाने जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

धोकेदायक परिसर - शहरातील सर्वच कॉलनी परिसरात एकसारखीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा चितोड रोड, मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, मालेगाव रोड, वडजाई रोड, देवपुरात वाडीभोकर रोड, नकाणे रोडवरील सर्व कॉलनी, दत्त मंदिर चौक, नगावबारी परिसरातील सर्व कॉलन्यांचा यात समावेश आहे.

त्वचाविकारचा रोग - घाण पाणी आणि उकिरडयावरील फेकलेले पदार्थ खाल्याने भटक्या श्वानांना त्वचारोग होतो. त्यावर उपचार न झाल्यामुळे हा रोग वाढतच जातो. महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची पैदास नियंत्रित करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मनपाने यासाठी निविदाही काढली होती. परंतु, नंतर हे सर्व पेडिंग राहिले. रोगट श्वानांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत. शहरात काही सोशल संघटना आणि तरुण वैयक्तिकरित्या हे काम करत आहेत. मनपानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही समस्या हळूहळू गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.

- डॉ. संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग