पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:05+5:302021-05-12T04:37:05+5:30
आरोग्य कर्मचारी असो वा पोलीस यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर काम आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना दिवसरात्र उभे राहावे ...

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
आरोग्य कर्मचारी असो वा पोलीस यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर काम आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना दिवसरात्र उभे राहावे लागत आहे़ त्यात पुन्हा आपली आवड निवड ते अगदी विसरून गेले की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी आरोग्य कर्मचारी असो वा पोलीस यांनी आपल्या आवडी-निवडी जोपासायला हव्यात. त्यातून त्यांना आलेला कामांचा ताण काहीअंशी का असेना दूर होण्यास मदत होऊ शकते आवडी जोपासल्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होऊ शकतात. परिणामी त्यांच्यातील कामांचा निर्माण झालेला ताण निश्चितच कमी झालेला असेल, असा अंदाज आहे़ आपल्या आवडी निवडी ज्या असतात अथवा आपली जी आवड आहे त्याची जोपासणा केल्यास त्यातून आपल्या कामांत आलेला तणाव निश्चित दूर होण्यास मदत होऊ शकते.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य
कोरोना असो वा कोणताही आजार यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य हे फार महत्त्वपूर्ण आहे. काम करीत असताना आपल्यातील क्षमता कधीही कमी होऊ देऊ नये. आपली आवड ओळखून त्यात मन रमवावे. त्यातून आपला ताण कमी झाल्यासारखे वाटेल.
- डॉ. मोहन सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक
मानसिक आरोग्य पोलिसांचे
काळ हा कोरोनाचा असो वा कोणताही, यात पोलिसांना सदैव तत्पर रहावे लागते. काहीवेळेस तर वेळेचेदेखील बंधन नसते. अशावेळी ताण येणे स्वाभाविक आहे. कर्मचाऱ्यांनी आपला जो काही असेल तो विरंगुळा जोपासायला हवा. पोलिसांची वेळोवेळी आरोग्य तपासणीदेखील होत असते.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
अधिकारी, कर्मचारी हे कोणत्याही विभागाचे असो त्यांना ज्यावेळी दैनंदिन कामांचा ताण येत असेल त्यावेळेस त्यांनी आपला विरंगुळा जोपासावा. त्यात आपले मन रमवावे कामांचा जास्त ताण घेऊ नये.
- डॉ. वैशाली पाटील, मानसोपचार तज्ज्ञ
कुटुंब अन् नोकरी सांभाळण्याची कसरतच
- वर्ष ते दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरु आहे़ त्यात रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे़ यात स्वत:च्या आरोग्यासह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते़ त्यातही वेळ काढून आम्ही आमचा विरंगुळा जोपासतो़
आरोग्य कर्मचारी
- कोरोनामुळे आणि कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाºया सेवेमुळे कामाचा ताण अधिक जाणवत आहे़ हा ताण कमी करण्यासाठी आम्ही आमच्यापरिने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत़ आमची आवड ही जसा वेळ मिळेल त्यानुसार त्याची जोपासना करतो़
आरोग्य कर्मचारी
- केवळ आता कोरोना आहे म्हणून नाहीतर आमचा बंदोबस्त वेळोवेळी ठिकठिकाणी कायम असतो़ आम्ही आमचे कर्तव्य बजवत असताना वेळेचे देखील भान राहत नाही़ अशा वेळी ताण आमच्या मनावर येत असतो़ तो दूर करण्यासाठी आवडी जोपासतो़
पोलीस कर्मचारी
- आजच्या काळात काम आणि ताण हे समीकरण झाले आहे़ काम हे आवडीने करायला हवे, त्याचा ताण घेण्याची गरज नाही़ आपली आवड काय हे ओळखून कामांतून वेळ काढून त्याची जोपासणा करायला हवी़ असे केल्यास आपल्यातील ताण हा दूर झालेला असेल़
- पोलीस कर्मचारी
- एकूण आरोग्य कर्मचारी : ४५००
- डॉक्टर्स : ६५०
- एकूण पोलीस : १५१७
- पोलीस अधिकारी : ११०