शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

आरोग्य योजनेशी संलग्न दवाखाने ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:56 PM

पालकमंत्री : कोरोनाचा संसर्ग वाढल्यास संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय

धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भिती शासनाने व्यक्त केली असली तरी धुळे जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे़ तरीही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री अब्दल सत्तार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़धुळे शहरात आवश्यकतेप्रमाणे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर लॉकडाऊनचा पर्याय देखील खुला असल्याचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, खासदार सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुक शाह, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे आदी उपस्थित होते़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करतानाच हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ५५ खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तातडीने कार्यान्वित करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले़शहरातील साक्री रोडवरील संस्कार गतीमंद मुलींच्या बालगृहात एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याने संस्थाचालकांसह सर्व कर्मचाऱ्यांची स्वॅब घेवून त्यांना क्वारंटाईन केले आहे़ त्यामुळे या मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांनी स्विकारावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे़ त्यामुळे इतर जिल्ह्यातून तसेच कंत्राटी डॉक्टरांच्या भरतीच्या माध्यमातून मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचा निर्णय घेतला आहे़शेतकºयांचा संपूर्ण कापूस आणि मका खरेदी केला जाणार आहे़ तसेच बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता आहे़ प्रधानमंत्री पिक विमा योजना आता बंधनकारक नसून ऐच्छिक आहे़ या योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय शेतकºयांनी घ्यावा़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पूर्वतयारी आणि प्रयत्नांची माहिती देताना जिल्हाधिकारी संजय यादव सांगितले की, जिल्ह्यात २५ संस्थांशी चर्चा झाली असून ५०० खाटा सज्ज ठेवण्याची तयारी आहे़ धुळे शहरासह दोंडाईचा, साक्री आणि शिरपूर येथे आॅक्सिजन सप्लायचे पाचशे बेड तयार केले जाणार आहेत़ त्यासाठी आॅक्सिजन पाईपलाईनचे काम अंतीम टप्प्यात आहे़ आरोग्य यंत्रणेची क्षमता दहापट वाढविण्याचे नियोजन आहे़ डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांचे नियोजन केले जात आहे़ तसेच धुळे शहरात बंद असलेले दोन सरकारी दवाखाने सुरू केले जाणार आहेत़ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसारख्या शासकीय योजनांशी संलग्न खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा झाली आहे़ सुरूवातील त्यांनी विरोध दर्शविला होता़ परंतु आता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले असून रोटेशननुसार प्रत्येक जण २१ दिवसांसाठी आपला दवाखाना डॉक्टर आणि कर्मचाºयांसह प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे़ या दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले़जिल्हाधिकारी यांची खंत४परप्रांतीयांच्या स्थलांतरामुळे धुळे आणि शिरपूर येथे महामार्गांवर गर्दी होती़ यावेळी मदत आणि व्यवसाय करण्याच्या उद्देशाने संपर्क आल्याने संसर्ग वाढला़ शिरपूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले़ त्यामुळे घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहिम प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात हाती घेतली आहे़ परंतु नागरिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करीत नसल्याची खंत जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली़ कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत त्यांनी दिले़कोरोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा दान करणाºया मोहम्मद आसिफ सगीर अहमद शेख या तरुणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूमुक्त झाला. सोमवारी प्लाझ्मा दान केले.

टॅग्स :Dhuleधुळे