शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:57+5:302021-03-27T04:37:57+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्याचा होणारा मोठ्या प्रमाणात विस्तावर व रूग्णांना येणाऱ्या वैद्यकीय अडचणी लक्षात घेऊन शिदखेडा ग्रामीण रूग्णालयाचे ...

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
धुळे : शिंदखेडा तालुक्याचा होणारा मोठ्या प्रमाणात विस्तावर व रूग्णांना येणाऱ्या वैद्यकीय अडचणी लक्षात घेऊन शिदखेडा ग्रामीण रूग्णालयाचे रूपातंर उपजिल्हा रुग्णालयात व्हावे, यासाठी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे व पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिंदखेडासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण आढळत आहेत. शिंदखेडा शहर व परिसरातील दीड लाख लोकसंख्या येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. सध्याची कोविड परिस्थिती व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ अभाव आहे. त्यामुळे शिंदखेड्यातील रुग्णांना दोंडाईचा, शिरपूर किंवा धुळे येथे जावे लागते. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय पाणी व स्वच्छतेची समस्या, कर्मचाऱ्यांची समस्या, रुग्णवाहिका अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे गरजेचे आहे, असल्याचे हेमंत साळुंखे यांनी म्हटले आहे.