तीन लाखांसाठी अमळगावच्या विवाहितेचा छळ

By अतुल जोशी | Updated: March 8, 2024 18:24 IST2024-03-08T18:24:25+5:302024-03-08T18:24:58+5:30

चार जणांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

harassment of married woman of amalgaon for three lakhs | तीन लाखांसाठी अमळगावच्या विवाहितेचा छळ

तीन लाखांसाठी अमळगावच्या विवाहितेचा छळ

अतुल जोशी, धुळे : शेतीची अवजारे घेण्यासाठी विवाहितेने माहेरून तीन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा १२ मे २०१८ पासून ते ११ ॲागस्ट २०२२ या कालावधीत छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. याप्रकरणी तिने ७ मार्च २४ रोजी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून पती रवींद्र वाल्हे (वय ३५), सासू लताबाई वाल्हे (५८), सुधाकर वाल्हे (४०), शुभांगी वाल्हे (वय ३५, सर्व रा. अमळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

Web Title: harassment of married woman of amalgaon for three lakhs