शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ७४ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 10:36 PM

३० जणांना केली अटक : मध्यप्रदेशासह गुजरातकडून येणाऱ्या मालावर पोलिसांचा राहणार ‘वॉच’, गुटख्याची तस्करी रोखण्याचा होतोय प्रयत्न

धुळे : मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून महाराष्टÑात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जातो. गत आठ महिन्यात धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनअंतर्गत गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून, तब्बल ७४ लाख ५७ हजार ४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी ३० संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुटख्याचा नेमका साठा येतो कुठून, आणि त्याची विल्हेवाट कुठे लावली जाते, याचा शोध गांभिर्याने घेण्याची गरज आहे़महाराष्टÑात गुटख्यावर बंदी आहे. धुळे जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने, या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असते. छुप्या मार्गाने येणारा हा गुटखा कधी ट्रकमध्ये तर कधी छोट्या वाहनांतून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या़ गेल्या आठ महिन्यात धुळे शहर पोलीस ठाणे, आझादनगर पोलीस ठाणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, देवपूर पोलीस ठाणे, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे तालुका, सोनगीर, पिंपळनेर, शिरपूर शहर, शिरपूर तालुका, नरडाणा, दोंडाईचा अशा विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुटखा हस्तगत करण्यात आला आहे़गुजरात आणि मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा गुटखा हा प्रामुख्याने ट्रकमधून येत असलातरी त्यात अन्य साहित्य ठेवून लपवून आणला जात आहे़ हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर येणारे वाहन तपासणी करण्याची सुध्दा बहुतेकवेळा मर्यादा पोलिसांना येत आहे़ त्याचाच गैरफायदा गुटखा तस्करी करणारे उचलत असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिरपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या कारवाईत तर ट्रकमध्ये डाळ भरलेली होती़ चालकाने ट्रक थांबवून केवळ डाळ असल्याचा बनाव केला होता़ पण, पोलिसांना मिळणारी माहितीत सत्यता असल्यामुळे गुटख्याची होणारी तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले़ काहीवेळेस तर ट्रकांची तपासणी करुन देखील त्यात गुटखा आढळून येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ तर गुटख्याचा माल काहीवेळेस अंधाराचा फायदा घेऊन जिल्ह्यात आणला गेला असेल तर तो दडवून ठेवल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़ दोनच दिवसांपुर्वी धुळे तालुक्यातील मोरदडतांडा रेल्वे क्रॉसिंग ते तरवाडे गावाकडे जाणाºया रस्त्यालगत असलेल्या काही गाळ्यांमध्ये गुटखा दडवून ठेवला असल्याचे कळताच गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्याचा हा मुद्देमाल तब्बल १० लाखांचा होता़दरम्यान, जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातंर्गत झालेल्या या कारवाईत तब्बल ३० जणांना जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे़ त्यांच्याकडून एकत्रित ७४ लाख ५७ हजार ४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़मूळ माफियांपर्यंत़़़!गुटखाबंदी कायदा लागू झाल्यापासून सर्रास गुटखा विक्री छुुप्या रितीने होत आहे़ पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई होते़ मोठा साठा पकडला जातो़ गुन्हाही दाखल होतो़ परंतु गुटख्याच्या या गोरखधंद्यात मुळ माफियांपर्यंत पोलिसांचा तपास कधी पोहचेल? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो़

टॅग्स :Dhuleधुळे