वाळु चाेरांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:45 IST2020-12-12T20:41:26+5:302020-12-12T20:45:34+5:30

पथके कार्यरत : तहसिलदरांनी पकडले वाळुचे डंपर

Gray look at the sand dunes | वाळु चाेरांवर करडी नजर

dhule

धुळे :  पांझरा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर आता महसूल प्रशासनाची करडी नजर आहे. गाैण खनिजाची चोरी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके कार्यरत झाली आहेत. धुळे शहर अपर तहसिलदार संजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी वाळूचे डंपर पकडून दंडात्मक कारवाई केली.
अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशानुसार तहसिल कार्यालयांच्या स्तरावर पथके तयार केली आहेत. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पथक देखील तयार केले आहे. दरम्यान, अपर तहसिलदार संजय शिंदे यांच्या पथकाने गाेंदूर राेडवर सकाळी साहेसहा वाजता वाळूचे डंपर पकडले. सदर वाहन जप्त करून अपर तहसिलदार कार्यालयात आणले आहे. 
याप्रकरणी संबंधितांला दंडात्क वसुलीची नाेटीस बजावली आहे. दीड लाखांपर्यंत दंडाची वसुली केली जाणार आहे, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.
पांझरा नदी पात्रात माेठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी तहसिलदारांच्या पथकाने शहरातील विविध रस्त्यांवर फेरफटका मारण्याचे मोहिम हाती घेतली आहे. या दरम्यान शुक्रवारी गोंदूर रोडवर वाळूच डंपर जात असल्याचे दिसले. त्यात दीड ब्रास वाळू हाेती.
कारवाई करणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी आर. पी. कुमावत, नगांवचे मंडळाधिकारी सी. ओ. पाटील, फागणे तलाठी बाविस्कर, नगांव तलाठी माळी, चिताेड तलाठी चाैधरी, कुंडाणेचे महाजन यांचा समावेश हाेता.
धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाच्या हद्दीत पांझरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. नकाने रोडने रात्रभर शंभर ते दोनशे वाळूची वाहने पास होत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण तहसिलदारांच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी मध्यरात्री मोठी कारवाई केली होती. परंतु त्यात सातत्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजी वाळू उपसा सर्रासपणे सुरूच आहे. 
धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाने कारवाईबाबत चांगला धडका घेतला होता. त्यात सातत्य ठेवले तर पांझरा नदीतील वाळू सुरक्षित राहू शकते असे नदीकाठच्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नेर, कुसूंब्यापासून नकाने रोडने रात्रभर अवजड वाळू वाहनांचा ताफा सुरू राहतो. त्यामुळे रस्त्याची देखील दुरावस्था होत असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महसूल विभागाने येथील वाळू उपशाकडे लक्ष देण्याची गरज आहे. बोरकुंड ता. धुळे परिसरात देखील वाळू माफियांनी उच्छाद मांडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Gray look at the sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे