Gram Panchayat Office Rambharose | ग्रामपंचायत कायार्लय रामभरोसे

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : तालुक्यातील सगळ्यात मोठे असलेले कापडणे गावातील ग्रामपंचायत कायार्लय वाऱ्यावर असल्यासारखी स्थिती आहे. कर्मचारी हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची महत्वाची कामे खोळंबत आहे. दरम्यान कायार्लयात कोणीही नसतांना मात्र येथे पंखे, दिवे सुरू राहत असून, विजेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कापडणे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे व प्रशासक तुषार तिवारी यांच्यासह अन्य कर्मचारी आहेत. मात्र कामाच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतांत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत कार्यालयात दाखले, शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी ग्रामस्थ येतात. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने येणाऱ्या ग्रामस्थांचे कोणतेही प्रकारचे काम पूर्ण होत नाही, अधिकाऱ्यांची वाट बघत ग्रामस्थांना माघारी जाण्याशिवाय पयार्य नसतो.
गावातीलच चेतन नरेंद्र पवार हे आपल्या आजोबांचे हयातीचा दाखल्यावर सही व शिक्का घेण्यासाठी आले होते मात्र कोणीही उपस्थित नसल्याने यापैकी कोणाचेही काम झालेले नाही.
गेल्या काही महिन्यापासून कापडणे ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सध्या ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्याद्वारे गावाच्या विकास कामे सुरू आहे.प्रशासक तुषार तिवारी आठवड्यातून कापडणे येथे मंगळवारी व शुक्रवारी असे दोनच दिवस येत असतात. अन्य दिवशी त्यांना दुसऱ्या गावाची जबाबदारी दिलेली असल्यामुळे तिवारी हेदेखील येथे दररोज उपस्थित राहत नाही . येथे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने कर्मचाऱ्यांची कामे खोळंबत असतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून ग्रामपंचायतमध्ये कायम कर्मचारी राहतील याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Gram Panchayat Office Rambharose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.