देवभाने धरणाचे पाणी पाटचारीत सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:55 IST2020-01-12T22:55:11+5:302020-01-12T22:55:43+5:30
कापडणे : परिसरातील शेतकऱ्यांना होणार लाभ

Dhule
कापडणे : देवभाने धरणाचे पाणी १२ रोजी जि.प. सदस्य रामकृष्ण खलाणे यांच्याहस्ते कापडणे पाटचारीत सोडण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे.
यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परंतू देवभाने कापडणे पाटचारी दुरुस्तीची अनेक वर्षांपासून शेतकºयांची मागणी होती. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रामकृष्ण खलाणे यांनी संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकाºयांकडे पाठपुरावा करून पाटचारीची दुरुस्ती करून घेतली. १२ रोजी दुपारी देवभाने धरणातून त्यांच्याहस्ते पाटचारीत पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी पाटकरी संजय वाणी, प्रकाश नाना माळी, अनिल नथ्थु माळी, विठोबा झुलाल माळी, जयेश माळी, ईश्वर माळी, सुरेश माळी, रमेश मोरे, भिलू माळी, राजेंद्र माळी यांच्यासह परिसरातील लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
पाटचारीत पाणी सोडण्यात आल्याने कापडणे, देवभाने, सरवड रस्ता व सोनगीर रस्त्यापर्यंतच्या शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे. लाभार्थ्यांनी त्वरित पाटकरी यांच्याशी संपर्क साधून पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत व शेतीसाठी पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य खलाणे यांनी केले.