शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिवणयंत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

धुळे : कोरोना महामारीच्या संकटात शिवणयंत्र विक्री आणि दुरुस्ती या व्यवसायाला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी ...

धुळे : कोरोना महामारीच्या संकटात शिवणयंत्र विक्री आणि दुरुस्ती या व्यवसायाला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी धुळ्यातील शिवणयंत्र व्यावासायिकांनी शासन-प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खाद्यपदार्थ, तेल, पशुखाद्य, दवाखाने, औषधालये आदी अत्यावश्यक वस्तूंच्या व्यवसायात शिवणयंत्राची भूमिका महत्त्वाची असते. कोरोनाशी लढण्याचे महत्त्वाचे हत्यार मास्क तयार करण्यासाठी शिवणयंत्राची आवश्यकता असते.

रुग्णालयातील चादर, रुग्णांचे कपडे, डाॅक्टरांचे कपडे, सर्जिकल गाऊन, स्क्रब तयार करण्यासाठीदेखील शिवणयंत्र लागते. या वस्तूंचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला नाही तर रुग्णालयांमध्ये असुविधा होऊ शकते. त्यामुळे शिवणयंत्राला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक व्यवसायाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आहे. रब्बी हंगामाची पिके आता काढली जात आहेत तर काहींनी काढली आहेत. धान्य साठविण्यासाठी गोण्यांचा वापर केला जातो. बॅग क्लोझर शिवणयंत्राच्या साहाय्याने गोण्या पॅक करून बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तेल उत्पादक तसेच पशुखाद्य कंपन्यांनादेखील शिवणयंत्रे पॅकिंगसाठी आवश्यक असतात.

या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होऊ नये, पुरवठा सुरक्षित आणि नियमित व्हावा यासाठी शिवणयंत्रांची विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवणयंत्र विक्रेते आणि दुरुस्ती कामगारांनी केली आहे.