शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

योग्य मोबदला द्या, अन्यथा शेती परत करा; सुलवाडे - जामफळ - कनोली योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच सरकार देत असलेल्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य नाही. ...

यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच सरकार देत असलेल्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य नाही. उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. या योजनेत शेतजमिनी संपादित झाल्या आहेत. बाजारभावाच्या चारपट मोबदल्याची मागणी आहे.

साहेबचंद जैन यांनी सांगितले की, सोनगीर, सोंडले परिसरातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेतजमिनी संपादित केल्याची नोंद केली आहे. जमिनी विक्रीला प्रतिबंध करण्यात आला; परंतु अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. शासनाने केलेला निवाडा समाधानकारक नाही. त्या निवाड्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सन २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चारपट मोबदला द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या परवानगीने जमिनी संपादित कराव्या, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी चर्चा न करता जमिनी संपादित केल्याने आता विक्री करता येत नाही, कर्जही मिळत नाही, शासनाच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उताऱ्यावरील नोंदी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.