शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना २४ तास वीज, मोफत प्रवासाची सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:41 IST

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची राज्यपाल कोशारी यांच्याकडे मागणी

धुळे : शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एसटीत मोफत प्रवासाची सुविधा मिळावी आदी मागण्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आल्या. राज्यातील बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील (पढावद) यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेण्यात आली. त्यावेळी वरील मागण्या करण्यात आल्या.शिष्टमंडळाने सांगितले की, राज्यात सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून दिली जाते. मात्र शेतीसाठी केवळ आठ तासच वीजपुरवठा करण्यात येतो. जो पुरवठा होतो, तोदेखील कमी दाबाने होत असतो. शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून दिल्यास विजेचा वापर थोडाफार वाढेल. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व देखभाल खर्च कमी होईल. उत्पादनदेखील वाढेल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगरमध्ये बदल करून शेतकऱ्यांना नुकसानकारक करण्यात आले. जे ट्रिगरकधी येऊन शकत नाही असे ट्रिगर ठेवण्यात आले. हे ट्रिगर विशेषत: केळी व डाळिंब फळपिकांचे जास्त नुकसानकारक आहेत. त्यामुळे २०१९ला जे ट्रिगर होते तेच ट्रिगर कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.राज्यातील इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी बसचा प्रवास मोफत दिला जातो. तशीच सुविधा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनाही देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना टोलमाफी देण्याचीही मागणी केली.दरम्यान, हे निवेदन माझ्या शिफारशीने सरकारला पाठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यपालांना शिष्टमंडळास दिले. तसेच ॲड. प्रकाश पाटील यांनाही आपण कृषीचे पद्मभूषण आहात, असे गौरोद्गार काढले.या शिष्टमंडळात ॲड. प्रकाश पाटील (पढावद), नरेंद्र पाटील (लोणी, ता.चोपडा), हेमंत देशमुख (वाशिम), उत्तमराव ठोंबरे (नाशिक), कृष्णा पवार (औरंगाबाद), अनंता पाटील (हिंगोली), श्रीकांत आखाडे (जालना) यांचा समावेश होता. यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

टॅग्स :Dhuleधुळे